Ram Shinde: निवडून येताच राम शिंदे म्हणाले अडीच वर्षे मतदारसंघात ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ram Shinde: महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये (Maharashtra Legislative Council) नुकताच विजय झालेल्या राज्याचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे कर्जतमध्ये (Karjat) तालुका भाजपकडून (BJP) जंगी स्वागत करण्यात आला आहे. यावेळी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 मागच्या गेली अडीच वर्षे मतदारसंघात विकास ठप्प झाला होता. मी मंजूर करून आणलेल्या कामांचीच भूमिपूजन आणि उद्‌घाटने होत होती. असं टोला त्यांनी  रोहित पवार यांना लावला आहे.

तर संतगोदड महाराज मंदिरात प्रवेश करताच आघाडी सरकार कोसळणार असल्याची बातमी आली. आता त्यांच्याच आशीर्वादाने आपले सरकार स्थापन होत पुन्हा एकदा आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. 

सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेत राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. तालुक्यात शिंदे यांची विविध ठिकाणी विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिंदेंनी देखील सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद दिले. त्यांनी ग्रामदैवत संत सद्‌गुरू गोदड महाराजांची महाआरती करून दर्शन घेतले.  

शासकीय विश्रामगृहाजवळून शिंदे यांच्या विजयी मिरवणुकीस सुरवात झाली.  महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेत विजयी मिरवणूक शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदानात फुलांच्या भव्य हारात राम शिंदेंना गुंफण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान सेलचे सुनील यादव, ज्येष्ठ नेते ॲड. शिवाजीराव अनभुले, डॉ. रमेश झरकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, नगरसेविका अश्विनी गायकवाड, काका धांडे, पप्पू धोदाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे, विनोद दळवी, अनिल गदादे, युवा नेते प्रवीण फलके, मनीषा वडे, राणी गदादे, आशा वाघ, दादा सोनमाळी, संजय भैलुमे, दत्ता कदम, शेखर खरमरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.