पावसाळ्यात जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी काय कराल? तज्ज्ञांचा हा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Tips : पावसाळ्यात माणसांप्रमाणेच जनावरांनाही रोगराईचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासंबंधी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणात बाह्य परोपजीवी जसे की माशा, पिसवा, डास यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बुटॉक्स, इक्टोमिन या औषधांची जनावरांच्या अंगावर तसेच गोठ्यात फवारणी करावी.

गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी कडूनिंब, सिताफळ यांसारख्या पाल्याची धुरी करावी. काही भागात मान्सूनपूर्व पावसामुळे गवताची उगवन झाली आहे. असे कोवळे गवत जनावरे जास्त प्रमाणात खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

शेळ्या मेंढयांमध्ये रोग प्रतिबंधक लसीकरण केले नसल्यास तातडीने लसीकरण करून घ्यावे. पावसाचा अंदाज घेऊन जनावरांसाठी योग्य निवारा करावा. विशेषत: शेळ्या मेंढ्यांबाबत त्या पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेळ्या मेंढ्या माजावर येत असल्याने त्यांच्या खाद्यात वाढ करावी.

गोठा कोरडा राहावा यासाठी गोठ्यात चुना भुरभुरावा, असाही सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे,

असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील ओल लक्षात घेऊन वाफसा आल्यास पेरणी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.