उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आमदारांचं वेतन पूर्ववत होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-वर्षभर आमदारांनी 30 टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, आता 1 मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे वेतन पूर्ववत केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं.

यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी 4 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 350 कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

नगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 तर विधानपरिषदेचे 2 असे एकूण 14 आमदार आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. तसेच नगर जिल्ह्याला आमदार निधीच्या रूपाने 14 कोटींचा निधी अधिक मिळवता येणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर