Ajab Gajab News : तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे तुमच्या रक्त गटावरून ओळखता येते !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : काही मुले जन्मजात हुशार असतात. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेली असते, तर काही मुले कमी हुशार असतात. अशा मुलांना आपल्याकडे ‘ढ’ असे म्हटले जाते. शिक्षणात ‘ढ’ असलेले विद्यार्थी पुढे कमालही करू शकतात,

अशी अनेक उदाहरणे आहेत हा भाग वेगळा. पण आज आपण बोलणार आहोत, तुमच्या आमच्या हुशार असण्या किंवा नसण्यावर. याचे कारण म्हणजे कॅलिफोर्निया विद्यापिठातील संशोधकांनी असे काही संशोधन केले आहे की, तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे तुमच्या रक्त गटावरून ओळखता येते, आता बोला.

काय आहे की आपल्याला अमूक एक गोष्टीबद्दल फारसे काही समजत नाही, असे आपण आपल्या मित्र- मैत्रिणींसमोर स्पष्टपणे बोलतो. पण समाजात आपल्याला कोणी ‘ढ’ म्हटलेले कोणालाच आवडत नाही.

परंतु कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी असा शोध लावला आहे की, ज्यामुळे आपण आपले हुशार असणे किंवा ‘ढ’ असणे लपवू शकत नाही. या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, तुमच्या रक्तगटावरून तुमचा ‘आयक्यू’ अर्थात बुध्यांक मापला जाऊ शकतो.

सोप्या भाषेत तुमच्या रक्त गटावरून तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे ओळखता येऊ शकते. या संशोधनातून काढण्यात आलेले निष्कर्ष फार रंजक आहेत. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे. की, बी पॉझिटिव्ह हा रक्तगट असलेले लोक सर्वात हुशार असतात. येथे हुशार याचा अर्थ असा की या लोकांच्या मेंदूची कार्यक्षमता विलक्षण असते.