Home Gardening Tips: कुठल्याही खताचा वापर न करता घराजवळील बगीचा ठेवा नेहमी हिरवागार! हा एकच पदार्थ पडेल उपयोगी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Gardening Tips:- आपण जेव्हा नवीन घर बांधतो किंवा एखादे घर घेतो तेव्हा साहजिकच त्या घराची सजावट करण्यासाठी किंवा घराचा परिसर आकर्षक दिसावा याकरिता घराच्या आजूबाजूस असलेल्या जागेमध्ये किंवा घराच्या समोर एक छोटेखानी बगीचा उभारतो. घराच्या कंपाउंडमध्ये एन्ट्री केल्यानंतर बगीच्यामध्ये असलेली आकर्षक फुल झाडे आणि वेली इत्यादी मुळे घरी येणाऱ्यांचे मन प्रसन्न होतेच.

परंतु आपल्या घरातील वातावरण देखील नेहमी प्रसन्न व उत्साहवर्धक राहते. या बगीचा व्यतिरिक्त आपण गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर वेगवेगळ्या कुंड्या ठेवून त्यामध्ये विविध वेली किंवा फुल झाडांची देखील लागवड करतो. परंतु बऱ्याचदा या ठिकाणी लावलेल्या झाडांची पाने गळतात किंवा झाडे परत परत सुकण्याची समस्या निर्माण होते.

झाडे नेहमी हिरवीगार रहावेत यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करतो तसेच बऱ्याच खतांचा देखील वापर करतो. कारण फुलझाडे किंवा वेली देखील  वनस्पती असल्यामुळे त्यांना वाढीसाठी व इतर आवश्यक क्रियांकरिता पोषक घटकांची आवश्यकता असतेच व त्यानुरूप आपल्याला त्यांचे नियोजन करावे लागते.

बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा वापर केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील फवारली जातात. परंतु तरी देखील  हवा तेवढा सकारात्मक परिणाम बघायला मिळत नाही. त्यामुळे या लेखांमध्ये आपण एका छोट्याशा पदार्थाची माहिती घेणार आहोत ज्याचा वापर केल्याने बाग नेहमी हिरवीगार राहील व यासंबंधीची माहिती एका इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेली आहे.

 या पदार्थाचा वापर करा आणि बागेतील झाडे हिरवीगार ठेवा

gardening.tips या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार पाहिले तर त्यानुसार आपण ब्रेड किंवा पिझ्झा तयार करण्यासाठी व ते व्यवस्थितरित्या छानसे फुलावे त्याकरिता यीस्ट वापरतो. याच यीस्टचा वापर तुम्ही तुमचा बाग छान फुलवण्यासाठी व हिरवागार ठेवण्यासाठी करू शकतात.

याकरिता तुम्हाला फक्त एक कप पाणी घ्यावे लागेल व त्यामध्ये एक टीस्पून यीस्ट टाकावे लागेल व एका तासाच्या कालावधीनंतर हे मिश्रण तुम्हाला झाडांवर फवारावे लागेल. यामुळे बगीच्यातील झाडांची पाने एकदम हिरवीगार होतात. तसेच दुसरी पद्धत म्हणजे एक कपभर पाणी घेऊन त्यामध्ये जर तुम्ही एक टीस्पून यीस्ट आणि एक टीस्पून बेकिंग सोडा घालून मिश्रण तयार करावे.

हे मिश्रण मातीमध्ये टाकल्यानंतर झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते व वाढ देखील पटापट होते. झाडांची वाढ चांगली होण्यासाठी आणि हिरवीगार राहण्यासाठी महिन्यातून एकदा उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच तिसरा प्रकार म्हणजे एक कपभर पाण्यामध्ये एक टीस्पून यीस्ट आणि बटाट्याच्या बारीक चिरलेल्या अर्धी वाटी फोडी घालाव्यात व हे मिश्रण झाडांना टाकले तरी झाडांना भरपूर फुले येतात.

एवढेच नाही तर तुम्ही एक कपभर पाण्यामध्ये एक टीस्पून यीस्ट आणि एक टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर मिसळून एकत्र केले व झाडांना दिले तर माती कायम भुसभुशीत राहते व मातीला कुठल्याही प्रकारचा कडकपणा येत नाही व झाडांसाठी हे खूप महत्त्वाचे असते.

अशा पद्धतीने तुम्ही या छोट्याशा पदार्थाचा वापर करून बाग नेहमी हिरवीगार ठेवू शकता.