Home remedies : बंद नाक, खोकला, घशामध्ये खवखव होत असेल तर घराच्या घरी करा हे उपचार….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home remedies :- आरोग्यविषयक काही समस्या अशा असतात, ज्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. काही घरगुती उपाय आजमावून आपण या समस्यांवर मात करू शकतो…

० बंद नाकासाठी उपचार :-
>>नाक स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ आणि नरम कापडाचा किंवा कापसाचा वापर करायला द्या.

>>मुलांना नाक शिंकरणे आणि स्वच्छ करण्याची पद्धती समजावून सांगा.

>>नाकात जमा झालेला स्त्राव स्वच्छ करण्यासाठी नॉर्मल सलाईन म्हणजे मीठाच्या पाण्याचा थेंब नाकात टाका, जेणेकरून जमा झालेला स्त्राव मुलायम होईल आणि नाक स्वच्छ करणं सोपं होईल.

० घशामध्ये खवखव :-
>>एखादा खाद्य पदार्थ किंबा चोखण्यासाठी काहीतरी द्या. यामुळे तोंडात लाळ निर्माण होईल. ज्यामुळे घशाची  खवखव कमी होण्यास मदत होईल.

>>पिण्यासाठी गरम पाणी द्या. गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायला देण्याने घशाची खवखव कमी होण्यास मदत होते.

० खोकल्याच्या उपचारात :-
>>खोकल्यापासून मुक्ती मिळावी यासाठी गरम पाणी आणि इतर गरम पेय पदार्थ पिणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. त्यामुळे सूप,
काढा, आल्याचा चहा, पेज पिण्यावर भर द्या.
>>मुलांच्या बाबतीत श्‍वास वेगाने घेणे, श्‍वास घेण्यास त्रास, जीभ किंवा ओठ निळे पडणे अशी लक्षणं दिसत असतील तर मुळीच वेळ वाया न घालवता त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.