Hotel Room Booking App: तासाच्या हिशोबाने हॉटेलची रूम बुक करायची असेल तर ‘या’ ॲपची घ्या मदत! होईल फायदाच फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hotel Room Booking App:- आपल्यापैकी अनेक जणांना बाहेर फिरायला जाण्याची हौस असते. तसेच काही कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये आपल्याला जावे लागते. तेव्हा जर आपल्याला एक-दोन दिवस थांबायची वेळ आली तर आपण हॉटेलमध्ये रूम बुक करत असतो किंवा आपण बऱ्याचदा पर्यटनासाठी कुठे फिरायला जातो

आणि काही दिवसांसाठी आपल्याला रूम बुक करायचा असतो अशा प्रसंगी आपण बऱ्याचदा डायरेक्ट हॉटेलशी संपर्क साधून रूम बुक करतो किंवा ओयोसारख्या एखाद्या एप्लीकेशन ची मदत घेतो.

परंतु बऱ्याचदा आपल्याला फक्त फ्रेश व्हायचे असते किंवा काही तासांसाठी रूम हवा असतो तरी देखील आपल्याला संपूर्ण 24 तासाचे चेक आउट करावे लागते. परंतु आता एक असे अप्लिकेशन आले आहे की त्या माध्यमातून तुम्ही अगदी तासाच्या हिशोबाने रूम बुक करू शकतात व या एप्लीकेशन चे नाव आहे हर्ली रूम्स(Hourly Rooms) हे होय.

हर्ली रूम्स अप्लिकेशनच्या मदतीने करू शकता तुम्ही स्वस्तात रूम बुक

तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेला आहात व तुम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी किंवा काही तासांसाठी हॉटेलचे रूम्स हवी असेल तर तुम्ही Hourly Rooms एप्लीकेशन ची मदत घेऊ शकतात.

या माध्यमातून तुम्ही अगदी तीन, सहा तसेच नऊ आणि बारा तासांसाठी रूमची बुकिंग करू शकतात.हे ॲप्लिकेशनच नाही तर प्लॅटफॉर्मच्या रूपात देखील उपलब्ध आहे.

 या माध्यमातून किती लागेल तुम्हाला रूमसाठी भाडे?

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रीमियम श्रेणी आणि इकॉनॉमि बजेट श्रेणी मधील हॉटेल्स ऑफर करतो. याशिवाय कपल फ्रेंडली तसेच डिहोटी स्पेशल, ट्रॅव्हलर्स अड्डा यासारखे फिल्टर देखील निवडू शकतात. जर तुम्ही किमतीबद्दल विचार केला तर हे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे.

सीजन आणि वेळेनुसार  याचे दर कमी जास्त देखील होतात. त्यावर दिल्लीमध्ये तीन तासासाठी तर तपासले जातात. तुम्हाला तीन तासांसाठी दिल्लीमध्ये रूम हवा असेल तर तुम्हाला सहाशे रुपये मिळू शकतात. एप्लीकेशन च्या फिल्टर मध्ये तुम्हाला 1 स्टार, दोन स्टार, तीन स्टार तसेच चार आणि पाच स्टार हॉटेलचे पर्याय तुम्हाला मिळतात.

एप्लीकेशन मध्ये तुम्हाला या संबंधी काही सुविधांसाठी अनेक फिल्टर देखील आहे. देशातील जवळपास 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये या ॲप्लिकेशनची सेवा उपलब्ध आहे. यामध्ये मुंबई तसेच नाशिक, ठाणे, दिल्ली तसेच जयपूर, आग्रा, राजस्थान, पुणे आणि मनाली या शहरांचा समावेश आहे.