Drinks For Lungs : या डिटॉक्स ड्रिंक ठरतील फुफ्फुसांसाठी वरदान, होतील हे फायदे..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drinks For Lungs : वाढत्या प्रदूषणामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. प्रदूषणाचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत असतो. यामुळे अनेकांना श्वसनासंबंधित आजार जडतात. तसेच फुफ्फुसाचेही विकार सुरु होतात. यासाठी आहारामध्ये काही डिटॉक्स ड्रिंकचा समावेश केल्यास फुफ्फुसाचे अनेक विकार दूर होऊन ते डिटॉक्स होते. जाणून घ्या या डिटॉक्स ड्रिंकबद्दल.

ग्रीन टी

ग्रीन टी ही वजन कमी करण्यास आणि त्वचेसाठी उपयुक्त असते हे. मात्र फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील ही खूप उपयुक्त आहे. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असते. ज्याचा फुफ्फुसाच्या टिशूज वरती अँटी – इंफ्लेमेटरी काम करते. यामुळे आले फुफ्फुस निरोगी राहते.

लिंबू आणि गरम पाणी

लिंबू हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. मात्र लिंबामुळे आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य देखील उत्तम राहते. फुफ्फुसाचा कोणताही त्रास असेल तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिणे फायदेशीर ठरेल.

हळदीचे दूध

औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली हळद अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि फुफ्फुसातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. अशा स्थितीत दुधात हळद मिसळून प्यायल्यास खूप फायदा होतो.

बीटाचा रस

बीट खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तर अॅनिमिया सारख्या आजारावर मात करण्यासाठी बीट अत्यंत उपयुक्त ठरते.
बीट हे आपल्या फुफ्फुसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्सने समृद्ध, बीटरूट फुफ्फुसाचे कार्य आणि ऑक्सिजन पातळी चांगली सुधारते.

लसूण

लसूण हा आपल्या रोजच्या आहारात वापरला जाणार घटक आहे. जर हिवाळ्यात लसूण खाल्ला तर आपल्या शरीरास तो अत्यंत पोषक ठरतो. लसूणमध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असल्यामुळे याच्या सेवनाने तुमचे श्वसन सुधारण्यास मदत होते.

मध आणि गरम पाणी

मध आणि कोमट पाणी हे घसा खवखवणे आणि खोकल्याचा त्रास यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे कोमट पाण्यात मध टाकून पिल्यास श्वसनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.