Ajab Gajab News : आता काय करायचं ? अचानक दारू पिणे बंद केल्याने होत असं काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News :आजवर आपण मद्यपान करण्याच्या दुष्परिणांबद्दल ऐकले आहे. मात्र, मद्यपानाचे व्यसन सोडण्याचे देखील दुष्परिणाम होऊ शकतात, असे पहिल्यांदाच एका संशोधनातून समोर आले आहे.

याबाबत सखोल संशोधन करणारे डॉ. केव्हिन मूर सांगतात की, दारू सोडण्याचे अनेक दुष्परिणाम संभवतात. अचानक दारू पिणे बंद केल्याने कॅन्सरचा धोका काही पटीने वाढतो. तसेच ब्लडप्रेशर ६ टक्क्यांनी वाढते. त्याचबरोबर वजनही कमी होते.

डॉक्टर मूर यांनी असाही दावा केला आहे की, दारू सोडण्यामुळे डायबेटीसचा धोका मात्र सुमारे २६ टक्के कमी होतो. दारू सोडण्यामुळे मेंदूची एकाग्रता वाढते तसेच गाढ झोप लागते.

‘लाईव्ह सायन्स’ नावाच्या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानुसार डॉ.मूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४५ वर्षे वयाच्या ९४ लोकांच्या मद्यपानाच्या सवयींचे अध्ययन करून हे निष्कर्ष काढाले आहेत.

दारू सोडण्याचा अन्य एक दुष्परिणाम म्हणजे मद्यपी लोकांच्या सेंट्रल नर्व्हज सिस्टीमला दारूची एवढी सवय लागलेली असते की, असे लोक जेव्हा अचानक दारू पिणे बंद करतात तेव्हा त्यांचा मेंदू हायपर अॅक्टिव्ह होतो.

त्यामुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा येतो. तसेच असे लोक एन्झायटी या मानसिक विकाराला बळी पडतात. त्यांना विचित्र असे भ्रम (हॅल्यूसिनेशन्स) होऊ लागतात. ज्याने अकाली मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

वयस्कर व्यक्तींच्या तुलनेने तरुणांना दारू पिण्यापासून जास्त धोका असतो. ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये यासंदर्भात एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वयस्कर व्यक्तींपेक्षा तरुणांसाठी दारू पिणे जास्त धोकादायक ठरते.