Ajab Gajab News : जगातील सर्वात वयोवृद्ध कोंबडी कोणती ? वाचा किती आहे तीच वय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : खरेतर प्रत्येक प्राण्याचे एक सरासरी वयोमान असते. काही प्राणी दहा ते पंधरा वर्षे जगतात. तर कासवासारखे काही प्राणी शंभर वर्षांहून अधिक वर्षे जगतात. कोंबडीची जगण्याची मर्यादा चार ते पाच वर्षे असते.

पण जगात अशी एक कोंबडी आहे की जी वीस वर्षांहूनही जास्त वर्षे जगली आहे. त्यामुळे तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. ती जगातील सर्वात वयोवृद्ध कोंबडी आहे.

या कोंबडीचे नाव तिच्या मालकाने पीनट असे ठेवले आहे. मार्सी पार्कर डार्विन असे तिच्या मालकाचे नाव आहे. मार्सने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, सर्वसामान्यपणे एका कोंबडीचे कमाल आयुष्य ७ ते आठ वर्षांचे असते. मात्र पीनटने नुकताच आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. म्हणजे पीनटने २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

वय एवढे वाढूनही पीनट आजही तंदुरुस्त आहे, असे मार्स सांगतो. ती दररोज सकाळी ब्ल्यूबेरी योगर्ट खाते. त्यामुळे तिची प्रकृती ठणठणीत राहिली आहे. पीनट सध्या अगदी श्रीमंती थाटात जगत आहे.

मार्स तिच्या आहाराबद्दल अत्यंत दक्ष असतो. तो तिला जीवापाड जपतो. सध्या पीनट वॉशिंग्टनमधील एका संरक्षित उद्यानात म्हणजेच ‘नो कील फार्म’ मध्ये शानदार आयुष्य जगत आहे.