Bhandardara Dam : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण लवकरच भरणार ! आता आहे ‘इतका’ पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Dam : भंडारदरा आशिया खंडातील सर्वात उंचावर व दगडी बांधकाम असणाऱ्या भंडारदरा धरणाचा जलसाठा १० टी.एम.सी. झाला असून धरणाला भरण्याचे वेध लागले आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी.एम.सी. च्या पुढे सरकला आहे.

भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० हजार १२७ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाला भरण्याचे वेध लागले आहेत.

दरवर्षी १५ ऑगस्ट पुर्वी भंडारदरा धरण भरण्याची परंपरा कायम असुन याही वर्षी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट होताच धरण शाखेकडुन तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर होणार का? असा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

कारण पाणलोटात पडत असलेल्या पावसाचा अंदाज बघुनच पाणी सोडले जात असते. त्यामुळे भंडारदरा धरण १० हजार ५०० दलघफु झाले तरी वरिष्ठाच्या आदेशानंतरच परिस्थिती बघुन नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याची माहीती धरण शाखेकडुन उपलब्ध झाली आहे.

भंडारदरा धरण ८३ टक्के झाले असताना मोठ्या प्रमाणात पाणी प्रवरा नदीत सोडले गेले होते. कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या दमदार पावसामुळे कृष्णावंती नदी दुथडी भरुन वाहत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्या लक्षणीय वाढ होत आहे.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६ हजार ७१६ दशलक्ष घनफूट झाला असुन धरण ८०.६४ टक्के भरले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पावसाने मारलेल्या दडीमुळे निळवंडे धरणामधुन ८०० क्युसेकने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.

गेल्या २४ तासात भंडारदरा येथे ४३ मीमी पावसाची नोंद झाली असुन घाटघर येथे ६० मीमी पाऊस कोसळला तर पांजरे येथे ५५ मीमी, रतनवाडी ६७ मीमी तर वाकी येथे ३१ मीमी पाऊस पडला. वाकी येथील लघुबंधारा पुर्ण क्षमतेने भरलेला असून कृष्णावंती नदीमध्ये १९७ क्युसेकने सुरु आहे.

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार १२७ दशलक्ष घनफूट झाला असुन धरण ९१.७४ टक्के भरले आहे. भंडारदरा धरण आता कधी भरते याकडे संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे.