मोठी बातमी ! एकनाथ शिंदेचं पहिलं ट्वीट, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यातील राजकारणात राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिले ट्विट (Tweet) केले असून राजकीय चर्चा वेगाने वाढू लागल्या आहेत.

काय आहे ट्विट?

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केले आहे.

शिंदे यांच्या या ट्विट मागे नेमका काय हेतू आहे हे अद्याप समजले नसून याबाबत अधिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, नुकतीच राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पत्रकार परिषद (Press conference) पार पडली असून मुख्यमंत्रीपदावर बोलताना शरद पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

ते म्हणाले, कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा, पण शिवसेनेकडेच मुंख्यमत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे (Congress) आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे.

मात्र उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नेतृत्व बदलण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटले आहे. तसंच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील.

त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.