Gautami Patil : गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले, चित्रीकरण करणारास अटक होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पोलीस देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याच व्हिडीओ प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. अनेकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी आता पोलीसही कामाला लागले आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात देखील केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपास सध्या करत आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गौतमीचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तिच्या चाहते देखील संतप्त झाले आहेत.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी सोबत ही धक्कादायक घटना घडली होती. आता या सगळ्या प्रकारांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.

याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे, याबाबत कारवाई केली जाणार आहे.