खोट्या अ‍ॅट्रोसिटी दाखल झाल्यास करणार ‘असे’ काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अ‍ॅट्रोसिटी कायद्याने बरीच क्रांती घडवली. त्याने अनेकांना न्यायही मिळवून दिला. परंतु अनेकदा या कायद्यान्वये अनेकांना अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे अनेक ठिकाणी घटना घडल्या.

अशा घटना पुन्हा घडल्या किंवा खोट्या अ‍ॅट्रोसिटी दाखल झाल्या तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

वांबोरी ता.राहुरी येथील सचिन पटारे या युवकावर जागेच्या वादावरून अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्यात आली. त्या विषयास अनुसरून नानासाहेब जावळे यांनी काल गुरुवारी राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेतली व त्यांना तसे निवेदन दिले.

जावळे म्हणाले, राजकीय जिरवाजिरवी करण्यासाठी विशिष्ट लोकांना पुढे करून मराठा समाजातील युवकांना संपविण्यासाठी खोट्या अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्यात येत आहेत.

यापुढे राजकीय कुरघोड्या करण्यासाठी जर कोणी दोन समाजात तेढ निर्माण करत असेल तर अखिल भारतीय छावा संघटना व मराठा क्रांती ठोकमोर्चा शांत बसणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe