कारखानदारांच्या जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा योगायोगच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- आज अहमदनगर करांच्या दिवसाची सुरवात माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन या बातमी ने झाली

आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना ची लागण झाल्याने हिरावला गेला.

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले.

त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते कोरोनामुळे गमावल्याच्या भावना नगरकरांमध्ये आहेत.

सरंजामी आणि कारखानदारांच्या जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करून

कित्येक वर्ष त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा ही एक योगायोगच म्हणावा लागेल !

दिलीप गांधी हे सलगपणे तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.

१९९९ मध्ये ते प्रथम खासदार झाले. २००३ ते २००४ या काळात केंदातील भाजपच्या सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते.

पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा चांगला संपर्क होता. त्या माध्यमातून पक्षाचे अनेक नेत्यांना त्यांनी नगरमध्ये आणले होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली होती.

नगरच्या राजकारणातही त्यांनी प्रचंड काम केलेले होते. ते पक्षाचे बराचकाळ शहरजिल्हाध्यक्ष होते.

नगर पालिका असताना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

त्यांच्या पुढाकारातून सध्या राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे.

खासदार असताना नगर शहरासह मतदारसंघातील ग्रामीण भागातही त्यांनी अनेक योजना राबविल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर