जुगार खेळण्यास मज्जाव करणाऱ्या महिलेची साडी ओढत केला विनयभंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील मेहेकरी परिसरात सोनेवाडी भागात एका महिलेच्या मुलाने भाऊबंदांना एल्लमा देवीच्या मंदिरासमोर जुगार खेळू नका, असा विरोध केला.

या कारणातून ९ जणांनी जमाव जमवून महिलेच्या पुत्तण्यास मारहाण केली. तसेच महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.

काल ७ वा. हा प्रकार घडला. ४० वर्षाच्या पिडीत महिलेच्या फिर्यादीयरुन नगर तालुका पोलिसात आरोपी महेश मुकेश गुंजाळ, मुकेश राजाराम गुंजाळ, दीपक गोरख गुंजाळ,

व इतर ५ जण सर्व रा. सोनेवाडी यांच्याविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक आबनावें करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment