पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा नवीन गणवेश ठरला ! शासनाचा संपूर्ण राज्यासाठी एक निर्णय, आता ‘असा’ असणार नव्या पद्धतीचा ड्रेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : शालेय विद्यार्थी म्हटले की गणवेश आलाच. अगदीकाही वर्षांपूर्वी पंधरा हाफ शर्ट व खाकी हाफ पॅन्ट असा गणवेश ठरलेला असायचा.

परंतु मागील काही वर्षांत या गणवेशात बदल होत गेलेले दिसले. दरम्यान आता शासनाने ‘एक राज्य, एक गणवेश’ हे धोरण घेण्याचे ठरविले असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून कोणता गणवेश असणार हे ठरले आहे.

आता विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा गणवेश दिला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून (सन २०२४-२५) राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ धोरण राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसह शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश दिले जाणार आहेत.

यंदाही सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्याचे धोरण ठरले होते. शासन स्तरावरून हे गणवेश मिळणार होते,

परंतु ऐन वेळी धोरणात बदल करीत गणवेशाचे पैसे शाळांना देण्यात आले. त्यातही एक गणवेश आधी, तर दुसरा उशिरा मिळाला.

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश दिला जातो.

आधी सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील आदींना लाभ दिला जात होता.

आता सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सरसकट सर्वानाच मोफत गणवेश देण्याबाबतचा निर्णय झाला असल्याबाबतची माहिती मिळाली आहे.

त्यानुसार आता शिक्षण विभागाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उन्हाळी सुट्ट्यानंतर साधारण १५ जूनला सर्वच ठिकाणी शाळा सुरू होतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना हे गणवेश दिले जातील अशी माहिती समजते.

  • ■ आता कसा असणार गणवेश
  • मुलांचा गणवेश : आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट किंवा हाफ पॅट असा मुलांचा गणवेश असेल.
  • मुलींसाठी गणवेश : आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असा मुलींसाठी गणवेश असेल.