देशातील ‘या’ NBFC एफडी वर देत आहेत 8% पेक्षा अधिकचे व्याज ? पहा यादी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top NBFC FD Rate : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा काही एनबीएफसीची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहेत.

खरेतर एफडी हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्कृष्ट आणि सुरक्षित पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे बहुतांशी लोक एफडीलाच प्राधान्य देतात. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एफडीचा पर्याय फायदेशीर राहणार आहे.

दरम्यान अनेकांच्या माध्यमातून देशातील अशा NBFC बाबत विचारणा केली जात होती ज्या FD साठी आठ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याजदर देतात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया देशातील आठ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याजदर देणाऱ्या एनबीएफसीबाबत.

बजाज फिनसर्व : बजाज फिनसर्व आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज फिन्सर्व या एन बी एफ सी कडून 36 ते 60 महिन्याच्या एफडी साठी 8.05% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

मुथूट फिनकॉर्प : ही देखील देशातील एक प्रमुख एनबीएफसी आहे. या फिनकॉर्प कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या फायनान्शिअल सर्विसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या फिनकॉर्प कंपनीकडून स्वस्त व्याजदरात आपल्या ग्राहकांना विविध कर्ज देखील पुरवले जात आहे.

याशिवाय या कंपनीकडून आपल्या ग्राहकांना एफडीसाठी अधिक व्याजदर ऑफर केले जात आहे. या मुथूट फिनकॉर्प कंपनीकडून एक ते दोन वर्षाच्या एफडी साठी 8% आणि दोन ते तीन वर्षांच्या एफडी साठी 8.5% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

श्रीराम फायनान्स कंपनी : ही देखील देशातील एक प्रमुख एनबीएफसी आहे. या फायनान्स कंपनीकडून देखील आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत.

श्रीराम फायनान्स ही आपल्या ग्राहकांना 24 महिन्यांच्या एफडी साठी 8.10 टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे. या फायनान्स कंपनीकडून 30 महिन्यांच्या एफडी साठी 8.30% आणि 50 ते 60 महिन्यांच्या एफडी साठी 8.60% असे दर्जेदार रिटर्न दिले जात आहेत.

महिंद्रा फायनान्स : या फायनान्स कंपनीकडून देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर केले जात आहे. या फायनान्स कंपनीकडून 42 महिन्याच्या एफडी साठी 8.05% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.