Business Ideas : कमी गुंतवणुकीत सुरु करा लाखोंचा नफा देणारा व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : अनेकजण नोकरी सोडून व्यवसायातून चांगली कमाई करू लागले आहेत. जर तुम्ही व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला संपूर्ण बाजाराची माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा.

सध्या बाजारात असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही सुरु करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात जास्त पैसे गुंतवावे लागत नाही. यापैकी एक व्यवसाय म्हणजे काळ्या हळदीचा व्यवसाय होय. यातून तुम्ही महिन्याला लाखोंचे उत्पन्न मिळवू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळ्या हळदीमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. पिवळ्या हळदीशी तुलना करायची झाली तर 1 किलो काळ्या हळदीला बाजारामध्ये 5000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. कारण काळ्या हळदीची ही किंमत तिच्या विविधतेवर आणि दर्जावर असते. आता तुम्हीही सहज काळ्या हळदीचा व्यवसाय कसा सुरू करू शकता.

अशी करा सुरुवात

हे लक्षात घ्या की या काळ्या हळदीची लागवड जून महिन्यामध्ये करण्यात येते. या हळदीच्या लागवडीसाठी भुसभुशीत चिकणमाती माती सर्वोत्तम मानली जाते. लागवड करत असताना पावसाचे पाणी शेतात साचू नये याकडे लक्ष द्यावे लागते. समजा तुम्ही एक हेक्टर जमिनीत 2 क्विंटल हळदीच्या बिया लावू शकता.

या पिकासाठी जास्त पाण्याची गरज असते ना कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा इतर खताची गरज असते. कारण काळ्या हळदीमधील औषधी गुणधर्मामुळे कीटक आणि पतंगांना ते आकर्षित करत नाही. जर तुम्ही जमिनीमध्ये थोडेसे शेणखत घातले तर चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता ७०-८० टक्क्यांपर्यंत वाढते.

औषधी गुणधर्म

काळ्या हळदीमध्ये आढळणारे औषधी गुणधर्म तिला खूप खास बनवतात. कारण काळी हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एवढेच नाही तर काळ्या हळदीचा उपयोग आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि इतर औषधांना बनवण्यासाठी करण्यात येतो.

किती होईल कमाई

कमाईचा विचार केला तर बाजारामध्ये पिवळ्या हळदीची 70 ते 100 रुपये किलो दराने विक्री करण्यात येते. तर काळ्या हळदीचा भाव 500 ते 5000 रुपये किलोपर्यंत आहे. काळ्या हळदीची किंमत तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असून तुमची काळी हळद जितकी चांगली असेल तितकी चांगली किंमत तुम्हाला मिळू शकते. 1 एकर म्हणजे सुमारे दीड बिघा जमिनीमध्ये तुम्हाला 12 ते 15 क्विंटल काळ्या हळदीचे उत्पादन मिळते.

दुसरीकडे, जर तुम्ही काळ्या हळदीचा किमान 500 रुपयांनी गुणाकार केला तर तुम्ही 15 क्विंटलसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंत कमवू शकता. हे एक बिघा पीक उत्पादन होते, जर तुमच्याकडे जास्त जमीन असेल तर तुमचे उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकते. तीन बिघा जमिनीत 7.5 लाख रुपये प्रति बिघा यानुसार तुम्ही 22.5 लाखांपर्यंत कमवू शकता. काळ्या हळदीचे पीक ८ ते ९ महिन्यांत तयार होते.