Farming Business Idea: मत्स्यपालनासोबत करा बदक पालन आणि मिळवा लाखोत दुप्पट नफा! वाचा ‘या’ व्यवसायाची पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea:- शेतीसोबत अनेक जोडधंदे भारतामध्ये पूर्वापार केले जातात. अगोदर पशुपालन आणि प्रामुख्याने शेळीपालन हे दोन व्यवसाय केले जात होते व त्यांचे स्वरूप देखील घरासमोर एक दोन गाई किंवा एक दोन शेळ्या या स्वरूपाचे होते. परंतु पशुपालन व्यवसाय असो किंवा शेळीपालन यासारख्या व्यवसायामध्ये आता अनेक तंत्रज्ञान विकसित झाल्याने मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून आता हे व्यवसाय केले जातात.

या दोन्ही जोड व्यवसायांच्या सोबत आता मत्स्य पालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर असे दृष्टिकोनातून केले जात आहेत. तसेच शेती संबंधित असलेल्या जोडधंद्यांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून खूप फायदा होतांना दिसून येत आहे.

आता यामध्ये जर आपण मत्स्यपालनाचा विचार केला तर ग्रामीण भागातील शेतकरी मत्स्य शेतीतून खूप चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहेत व यामध्ये देखील तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांचा नफा आणखीनच वाढला आहे. मत्स्यपालनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर मत्स्यपालन आणि त्यासोबत बदकपालन हे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणारे असून

शेतकऱ्यांनी जर मत्स्यपालना सोबतच बदक पालन केले तर  या दोन्ही व्यवसायांचे एकमेकांना परस्पर खूप मोठी मदत मिळते व उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना कमी लागतो. त्यामुळे या व्यवसायाची पद्धत नेमकी कशी आहे व शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? त्याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 मत्स्यपालन बदक पालन या व्यवसायांचा मिळेल दुहेरी फायदा

मत्स्यपालन करत असताना जर बदक पालन केले तर शेतकऱ्यांना या व्यवसायामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो. मत्स्यपालन तलावामध्ये जर बदक ठेवले तर तलावाची स्वच्छता होण्यास मदत होते. कारण बदक हे घाण खातात आणि तलावातील ऑक्सिजन पातळी उत्तम राखण्यास मदत करतात.

त्यामुळे तलावातील माशांना देखील एक चांगले वातावरण मिळते व माशांचा देखील विकास होतो. दुसरीकडे उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा कमी होतो  व शेतकऱ्यांना बदकांच्या मदतीने मत्स्यपालन व्यवसाय करून दुपटीने नफा मिळतो. एकच तलावामध्ये जर बदक पालन व मासे पालन केले तर दुहेरी फायदा मिळतो.

यामुळे माशांच्या खाद्यावरील जवळजवळ 75 टक्के खर्च वाचतो आणि बदकांच्या खाद्यावरील खर्चात देखील 30 ते 35 टक्क्यांनी घट होते. बदकांचा विचार केला तर साधारणपणे 24 आठवड्यांचे जेव्हा त्यांचे वय होते तेव्हापासून ते अंडी घालायला सुरुवात करतात व ही प्रक्रिया दोन वर्षापर्यंत चालू राहते. जर एक एकरचा तलाव असेल तर त्यामध्ये 250 ते 300 बदक सहजपणे पाळता येतात.

 बदकांसह मासे पाळण्याचे साधारणपणे स्वरूप

जर तुम्हाला मत्स्यपालनासोबत बदक पालन करायचे असेल तर तलावामध्ये माशांचे अंडे टाकू नयेत. कारण बदके त्यांना खाऊ शकतात व त्यामुळे नुकसान होईल. याकरिता एक एकर तलावात चार ते पाच हजार बोटे टाकावीत. यामध्ये विविध प्रजातींच्या माशांचा  समावेश आहे. या प्रजातींचे विशिष्ट गुणोत्तर तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. कारण माशांच्या विविध प्रजाती तलावाच्या आत विविध स्तरांवर अन्न खातात.

तलावामधील माशांच्या आहारात मोहरीची पेंड, भाताचा भुसा तसेच खनिज मिश्रण आणि बाजारातील तयार खाद्य द्यावे. हे सर्व तुम्ही एका गोणीत बांधू शकता व अर्धे तलावात बुडवून टाकू शकतात. या माध्यमातून मासेपालनाचा 6 ते नऊ महिन्यात एक किलो वजनाचे मासे मिळतील. अशा स्थितीत तुम्ही एका एकर तलावातून 18 ते 20 क्विंटल पेक्षा जास्त माशांचे उत्पादन घेऊ शकतात व त्यामुळे अधिक नफा मिळू शकतो.

 बदकांसह मासे पालनातून मिळेल दुप्पट नफा

साधारणपणे साडेचार महिन्यात अंडी घालण्यास पक्व होणाऱ्या बदकांच्या आहारात बरसिम घास, ओट्स तसेच भाजीपाल्याची साल, भाताची भुशी तसेच खनिज मिश्रण आणि बाजारात मिळणारे तयार खाद्य द्यावे. त्यावेळी 6 ते नऊ महिन्यात एक ते दीड किलो वजनाचा मासा तलावामध्ये वाढतो व एका एकर तलावातून 20 ते 25 क्विंटल मासळीचे उत्पादन मिळते. या माध्यमातून पाच ते सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.