FD Interest Rate : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! ‘या’ ठिकाणी एफडीवर मिळत आहे सर्वाधिक व्याज, त्वरित करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : सध्या अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अनेकजण सर्वात जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. आता तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करून हजारो रुपयांचा फायदा मिळवू शकता.

जास्त परताव्यासाठी अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. काही अशा बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर सर्वात जास्त परतावा देत आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप चांगली कमाई करता येईल. जाणून घ्या सविस्तर.

जाणून घ्या एसबीआय एफडी व्याज

या बँकेच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर बँकेकडून आपल्या 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के व्याज देण्यात येत आहे. यानंतर 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर लोकांना 4.50 टक्के आणि वृद्धांना 5.0 टक्के दराने व्याज देण्यात येते. 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के दराने व्याज मिळत आहे.

त्याशिवाय 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर, सामान्य लोकांना 5.75 टक्के आणि वृद्धांना 6.25 टक्के दराने व्याज मिळत आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.80 टक्के आणि वृद्धांना 7.30 टक्के व्याज देत आहे. तसेच 5 वर्षे ते 10 वर्षे व्याजदर 6.50 टक्के असून वृद्धांना 7.50 टक्के व्याजदर दिले जाते.

PNB एफडी व्याज

PNB बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर वृद्धांना 4 टक्के दराने व्याज मिळत आहे. 15 दिवस ते 29 दिवसांसाठी एफडी FD वर 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के व्याज मिळत आहे. तसेच 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 टक्के व्याज मिळत आहे. 180 ते 270 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के आणि वृद्धांना 5 टक्के दराने व्याज मिळत आहे. 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.30 टक्के व्याज दिले जाते.

त्याशिवाय 1 वर्षांवरील 443 दिवसांच्या FD वर 6.80 टक्के आणि वृद्धांना 7.30 टक्के व्याज मिळते. 445 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर 6.80 टक्के आणि वृद्धांना 7.30 टक्के दराने व्याज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.50 टक्के आणि वृद्धांना 7 टक्के व्याज मिळत आहे. त्याशिवाय 5 वर्षे ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्यांना 6.50 टक्के आणि वृद्धांना 7.30 टक्के दराने व्याज उपलब्ध करून दिले आहे.

HDFC एफडी व्याज

एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के आणि वृद्धांना 3.50 टक्के व्याज देते. तर 30 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 4% दराने वृद्धांना 3.50% व्याज मिळते. 61 दिवस ते 89 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना ४.५० टक्के आणि वृद्धांना ५ टक्के दराने व्याज मिळते. 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के दराने व्याज मिळते.

1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.60 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळते. 18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य FD वर 7.0 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के दराने व्याज मिळते.

तसेच बँकेच्या 2 वर्षे 1 दिवस ते 2 वर्षे 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के दराने व्याज मिळते. इतकेच नाही तर 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 7.0 टक्के दराने व्याज उपलब्ध करून देण्यात आले आहे. वृद्धांना 7.75  टक्के व्याज मिळते.