Financial Tips: मासिक 30 हजार रुपये पगारामध्ये कुटुंब कसे चालवायचे? पैशांची बचत कशी करायची? वाचा टिप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Financial Tips:- आजकाल महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तुम्ही कमावत असलेल्या पैशांमधून आयुष्य जगत असताना करावा लागणारा खर्च व त्यातून भविष्यासाठी आवश्यक असणारी बचत ही अगदी तारेवरची कसरत होताना दिसून येते. त्यामुळे बरेच कुटुंबामध्ये पती-पत्नी दोघे देखील नोकरी करताना आपल्याला दिसून येतात.

परंतु तरीदेखील पैसा वाचत नाही व गुंतवणुकीला देखील पैसा राहत नाही. त्यामुळे महागाईच्या  कालावधीत पैशांची बचत करणे खूप कठीण काम होऊन बसले आहे. त्यातल्या त्यात बऱ्याच जणांना 20 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान पगार असते व या पगारामध्ये तर घर चालवणे देखील कठीण होऊन जाते.

या अनुषंगाने जर तुम्हाला महिन्याला तीस हजार रुपये पगार असेल व यामध्ये तुम्हाला बचत देखील करायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला काही बाबतीत आर्थिक शिस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. अनुषंगाने या लेखामध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही एका महिन्यात पैशांची बचत चांगल्या पद्धतीने करू शकतात व त्या पैशाची गुंतवणूक देखील करू शकता.

 कमीत कमी पगारात या गोष्टीची घेतली काळजी तर तुम्ही वाचवू शकता पैसा

1- सगळ्यात महत्त्वाचे कर्ज घेणे टाळावे समजा तुम्हाला जर प्रतिमाह 30 हजार रुपये पगार असेल तर तुम्ही या पगारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्ज कुठल्याही पद्धतीचे घेऊ नये. बऱ्याचदा आपल्याला कमी पगार असल्यामुळे काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. पण कर्ज महाग असते आणि त्यामध्ये बराचसा पैसा ईएमआय स्वरूपात जात असतो. त्यामुळे शक्यतो कर्ज घेणे टाळण्याचा प्रयत्न करावा.

2- थोडे का असेना पैसे वाचवण्याची सवय अंगी बानवणे तसेच यामध्ये पैसे वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला काही करून थोडा पैसा बाजूला ठेवणे गरजेचे आहेच व ही सवय तुम्ही अंगी बाणवणे खूप गरजेचे आहे. जेव्हा ही थोडे थोडे पैसे वाचवण्याची सवय तुम्हाला लागते तेव्हा तुम्ही हळूहळू पैसे जमा करू लागतात.

यामध्ये तुम्ही तुमच्या पगारातून काही रक्कम बाजूला ठेवू शकतात व ही रक्कम फार मोठीच असावी अशी काही आवश्यकता नाही. यामध्ये तुम्ही अगदी शंभर रुपयांची छोटी रक्कम देखील साईडला काढू शकतात व त्याची बचत करू शकतात.

3- थोड्या रकमेची चांगल्या योजनेत गुंतवणूक तुम्ही केलेली ही बचत तुम्ही किसान विकास पत्र किंवा इतर कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून तुम्हाला यावर चांगले व्याज मिळेल व तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील. चांगल्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत गेला तर तुमचे बचत देखील हळूहळू वाढत जाते.

4- खर्च करा परंतु नियोजित पद्धतीने नियोजित पद्धतीने पैसे खर्च केले तर तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकतात व त्यामध्ये काही पैसे देखील वाचवू शकतात. परंतु तुम्ही खर्चाची कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग केले नाही तर तुम्ही पगारापेक्षा जास्त पैसे खर्च करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही आधीच योजना आखली व त्यानुसारच खर्च केला तर तुम्ही पैसा वाचवू शकतात.

समजा तुम्हाला काही खरेदी करायची आहे तर ती तुम्ही ही खरेदी सणासुदीच्या हंगामात किंवा विशेष प्रसंगी केली तर तुम्हाला कमीत कमी मासिक हप्त्यामध्ये मोठी खरेदी करता येणे शक्य होते. कारण अशा प्रसंगी तुम्हाला चांगल्या सवलती मिळण्याची शक्यता असल्याने कमीत कमी पैशात तुमची चांगली खरेदी होऊ शकते.

5- इतर कौशल्य विकसित करणे समजा तुम्ही नोकरी करत असताना इतर कौशल्य देखील विकसित करत राहणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही काही सरकारी कार्यक्रमांचा आधार घेऊ शकता व या माध्यमातून नवीन कौशल्य शिकू शकतात.

अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये तुम्हाला मोफत किंवा कमीत कमी शुल्क मध्ये अशा प्रकारचे कौशल्य शिकवले जातात व या कौशल्यांचा वापर करून तुम्ही अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळवू शकतात व हळूहळू तुमचे उत्पन्न वाढवू शकतात.