Sarkari Yojana: सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळेल महिलांना 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज! वाचा या महत्त्वाच्या योजनेच्या अटी व मिळणारे फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाकरिता अनेक योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून गरज असलेल्या नागरिकांना व्यवसाय उभारणीला देखील खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते.

या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते किंवा बिनव्याजी कर्जाचा लाभ दिला जातो. जेणेकरून अशा घटकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचवावा हा त्यामागचा सरकारचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांपासून तर महिलांपर्यंत देखील केंद्र सरकारच्या योजना आहेत.

यामध्ये खास महिला वर्गाचा विचार केला तर केंद्र सरकारने सुरू केलेली खास महिलांसाठी असलेली योजना म्हणजे लखपती दीदी योजना होय. ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना असून ही योजना प्रत्यक्षात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकारचे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते व त्यांना व्यवसाय करण्यासाठी किंवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवले जाते. त्यामुळे साहजिकच महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होतो.

नुकतेच देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दोन कोटी वरून तीन कोटी करण्यात आलेले आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.

 काय आहेत लखपती दीदी योजनेचे फायदे?

या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करता यावा यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर त्यानंतर व्यवसाय सुरू झाल्यानंतर बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचायचे याकरिता देखील मार्गदर्शन व मदत केली जाते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेतून महिलांना बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळतोच. परंतु कमीत कमी खर्चामध्ये विमा सुविधा देखील देण्याची तरतूद या योजनेत आहे. महिलांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतोच परंतु त्यांनी बचत करावी याकरिता देखील प्रोत्साहन दिले जाते.

 एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मिळते बिनव्याजी कर्ज

या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. परंतु शासनाकडून आर्थिक मदत देखील मिळते.

महिलांना स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरू करता यावा याकरिता लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून  एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते व हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त असते.

 लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी किंवा पात्रता

लखपती योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणत्याही महिला पात्र आहेत. त्यासोबतच संबंधित महिला ही त्या राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे असून बचत गटामध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे,तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे व त्याची योजना कशी आहे? याबद्दलची सगळी माहिती तुमच्या प्रादेशिक स्वयंसहायता गट कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचे असते.

या योजने करता जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा संबंधित विभागाकडून तो तपासला जातो व मंजूर केला जातो. मंजूर झाल्यानंतर तुमच्याशी थेट संपर्क साधला जातो. तसेच अर्जासोबत अर्जदाराचे आधार, पॅन कार्ड तसेच उत्पन्नाचा पुरावा, बँकेचे पासबुक, अर्जदाराचा वैध मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे देखील लागतात.