HDFC Bank Scheme: एचडीएफसी बँकेने चांगला परतावा देणाऱ्या ‘या’ विशेष योजनेची मुदत वाढवली; वाचा या योजनेची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank Scheme:- एचडीएफसी बँक ही देशातील एक मोठी आणि महत्त्वाची बँक असून देशामध्ये या बँकेचा ग्राहक वर्ग देखील मोठा आहे. देशातील इतर बँका ग्राहकांसाठी गुंतवणुकीकरिता ज्या काही मुदत योजना अमलात आणतात अगदी त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मुदत ठेव योजना आहेत व या मुदत ठेव योजनांच्या माध्यमातून चांगला व्याजदर दिला जातो.

मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट हा एक गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय असून गुंतवणूकदार बँकांमधील  मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीला जास्त प्राधान्य देतात. याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून देखील एचडीएफसी सीनियर सिटीजन केयर एफडी ही योजना राबवली जाते.

हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना असून नुकतीच बँकेने या विशेष मुदत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या तारखेत वाढ केलेली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या या विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 2 मे 2024 पर्यंत वाढवली आहे.

 एचडीएफसी बँकेच्या या विशेष मुदत ठेव योजनेचे वैशिष्ट्ये

या मुदत ठेव योजनेमध्ये ठेवीवर 7.75 टक्के व्याज मिळत असून एचडीएफसी बँकेच्या नियमित एफडी दरावर 0.5% प्रीमियम मिळण्याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना या 0.5% वर सीनियर सिटीजन केअर एफडीवर अतिरिक्त 0.25 टक्के व्याज मिळते. म्हणजेच एकूण अतिरिक्त व्याज 0.75 टक्के मिळते.

गुंतवणूक करणाऱ्यांना या अतिरिक्त व्याजाचा लाभ दोन मे पर्यंत मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही योजना पाच कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवर लागू होणार आहे. समजा तुम्ही आज म्हणजेच 23 एप्रिल 2024 रोजी पाच वर्ष आणि एक दिवसाच्या कालावधी करिता पाच लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर तुम्हाला 24 मार्च 2029 पर्यंत व्याजातून एक लाख 84 हजार 346 रुपये मिळतील.

म्हणजेच तुम्हाला मुद्दल आणि व्याज मिळून पाच वर्षात सहा लाख 84 हजार 346 रुपयांचा परतावा मिळेल. समजा तुम्ही पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 24 मार्च 2029 पर्यंत 18 लाख 43 हजार 471 रुपये फक्त व्याजातून मिळतील. म्हणजेच तुम्हाला पाच कोटी 18 लाख 43 हजार 471 रुपयांचा परतावा मिळेल.

 एचडीएफसी बँकेच्या या योजनेत गुंतवणुकीचे नियम काय आहेत?

ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी पाच हजार रुपयांपासून तर जास्तीत जास्त पाच कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी हा कमीत कमी पाच वर्ष आणि एक दिवस ते जास्तीत जास्त दहा वर्ष इतका आहे. तसेच या विशेष एफडी योजनेमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवर आणि पाच वर्ष एक दिवसांपेक्षा जास्त ठेवीवर तिमाही आणि मासिक व्याज दिले जाते.