सध्याची परिस्थिती एफडी करण्यासाठी चांगली आहे का ? काय म्हणताय तज्ञ, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit Scheme : अनेक लोक आपला बचतीचा पैसा एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास विशेष प्राधान्य देतात. एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना अन एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही आपल्या देशात खूपच अधिक आहे.

तुलनेने शेअर मार्केट आणि म्युचल फंडसारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी आहे. शेअर मार्केट आणि म्युचल फंड्स मध्ये निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो. पण काही प्रसंगी मोठा लॉस देखील होण्याची शक्यता असते.

हेच कारण आहे की अनेक लोक बँकांमध्ये एफडी करण्यालाच पसंती दाखवतात. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती एफडी करण्यासाठी चांगली आहे की नाही ?

हा सवाल उपस्थित केला जात आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पतधोरणाचा आढावा घेतला. यानंतर रिझर्व बँक ने रेपोरेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट वाढवण्यात आले होते.

त्यावेळी रेपो रेट 6.25 वरून वाढवून 6.50 करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कोणताच बदल केलेला नाही. खरे तर रेपोरेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले. सध्या एफडीचे व्याजदर हे उच्चांकी पातळीवर आहे.

अशा परिस्थितीत, सध्याचे विक्रमी व्याजदर हे किती दिवस टिकून राहणार हा मोठा सवाल आहे. तसेच सध्याचा काळ हा एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का हा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात तज्ञ लोकांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

ऑप्टिमा मनी मॅनेजर्स प्रा. लि. चे सीईओ आणि एमडी पंकज मठपाल सांगतात, आगामी काही दिवसांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याजदरांमध्ये काही बदल होईल असे सध्या तरी अजिबात दिसत नाही. आणि काही महिन्यांनंतर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.

व्याजदरात कपात झाल्यास त्याचा थेट परिणाम बँकांवर होणार असून तेही व्याजदरात कपात करतील. याचा अर्थ FD वरील व्याजदर आगामी काही महिने कमी होणार नाहीत अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला एफडी करायची असेल, तर एफडीसाठी हा खूप चांगला काळ राहणार आहे.