LIC Plans : दररोज फक्त 54 रुपये भरून वार्षिक मिळावा 48,000 रुपये, बघा LIC ची खास योजना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Plans : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून अनेक एकपेक्षा एक पॉलिसी चालवल्या जातात. LIC कडून अशा योजना ऑफर केल्या जातात जिथे गुंतवणूकदारांना अनेक लाभासह चांगला परतावा देखील मिळतो. आज आम्ही LICची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिचे नाव LIC जीवन लाभ उमंग योजना आहे . यामध्ये गुंतवणूकदारांना आयुष्यभर लाभ मिळतात आणि मॅच्युरिटीवरनंतर फायदे देखील मिळतात.

LIC ची जीवन उमंग ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, जीवन विमा योजना आहे. हे तुम्हाला उत्पन्नासोबतच सुरक्षितताही देते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा प्रीमियम भरण्याची मुदत संपेल, तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी होईपर्यंत सर्व्हायकल बेनिफिटचा लाभ मिळेल. तर परिपक्वता आणि मृत्यूवर, एलआयसीकडून पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम दिली जाईल.

25 वर्षे वयाच्या व्यक्तीने 30 वर्षांच्या कालावधीसाठी 6 लाख रुपयांच्या विमा रकमेसह LIC ची जीवन उमंग योजना घेतली तर. त्याला 1638 रुपये मासिक म्हणजेच दररोज 54.6 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

त्याच वेळी, पॉलिसीचे पेमेंट वयाच्या 55 व्या वर्षी संपल्यानंतर, त्याला परिपक्वता होईपर्यंत दरवर्षी 48 हजार रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला विमा रक्कम आणि बोनससह 28 लाखांची रक्कम देखल दिली जाईल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 100 वर्षे आहे म्हणजेच 100 वर्षांच्या वयातही मॅच्युरिटी लाभ मिळेल.

मृत्यू लाभ काय आहेत ?

या योजनेत मृत्यू लाभ देखील समाविष्ट आहेत. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम बोनससह विमा रकमेचा लाभ मिळेल. मृत्यू लाभ पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. प्रीमियममध्ये कर जोडले जात नाहीत.