LIC Policy : LIC च्या ‘या’ योजनेद्वारे दरमहा कमवा 12,388 रुपये, जाणून घ्या कोणती योजना?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lic saral pension yojana : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून देशातील अनेक नागरिकांना वेगवगेळ्या योजना पुरवल्या जातात. अशातच तुम्ही भविष्यासाठी चांगली योजना शोधत असाल तर आज आम्ही LIC कडून चालवल्या जाणाऱ्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत.

बऱ्याचदा पगारदार कर्मचारी सेवानिवृत्तीच्या नियोजनाची चिंता करतात. कारण एखादा व्यक्ती फक्तएका वयापर्यंत काम करू शकतो. यानंतर त्या व्यक्तीला निवृत्ती घ्यावी लागते. निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी नियमित पेन्शन आवश्यक आहे.

यासाठी एलआयसीची पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. LIC आपल्या ग्राहकांना अनेक पेन्शन योजना ऑफर करते. यापैकी एक LIC सरल पेन्शन योजना आहे. ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. येथे गुंतवणूक करून तुम्हाला चांगली पेन्शन मिळू शकते.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूकदार एलआयसी सरल पेन्शन योजना एकट्याने किंवा त्यांच्या जोडीदारासह निवडू शकतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. एकरकमी गुंतवणुकीनंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते. योजना घेताना गुंतवणूकदाराला एकरकमी प्रीमियम भरावा लागतो. या योजनेची खास गोष्ट अशी आहे की, ज्या रकमेपासून पेन्शन सुरू होते, तेवढीच रक्कम आयुष्यभर मिळते. ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

या योजनेत तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. मासिक पेन्शन किमान 1,000 रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6,000 रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 रुपये आहे. या योजनेत जास्तीत जास्त पेन्शन रकमेवर मर्यादा नाही. तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि तुम्ही 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी करत असाल तर तुम्हाला 12,388 रुपये मासिक पेन्शन मिळेल. आता तुम्हाला पेन्शनमध्ये जास्त रक्कम मिळवायची असेल, तर त्यानुसार तुम्ही एकरकमी प्रीमियममध्ये जास्त रक्कम जमा करू शकता.

तुम्ही एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेअंतर्गतही कर्ज घेऊ शकता. योजना सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर गुंतवणूकदार कर्जासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यास, तुम्ही पॉलिसीमध्ये जमा केलेले पैसेही काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, ग्राहकाला मूळ किमतीच्या 95% परत मिळतात.