LIC Scheme: दररोज 200 रुपयांची बचत तुम्हाला बनवेल 28 लाखांचा धनी! वाचा एलआयसीची महत्वपूर्ण योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Scheme:- मेहनतीने कमावलेला पैसा आणि त्या पैशाची भविष्यकालीन आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून केलेली गुंतवणूक याला खूप महत्त्व आहे. कारण भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या उद्भवल्या तरी आपण आपल्याला गुंतवणुकीतून त्या समस्येवर मात करता यावी या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

जर आपण सध्या गुंतवणुकीचे पर्याय पाहिले तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध असून त्यातील वेगवेगळ्या पर्यायांचा वापर गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी करतात. काहीजण रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड एसआयपी तसेच बँकांमध्ये मुदत ठेव यासारख्या पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

कारण गुंतवणूक करताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टींना खूप महत्त्व असते व या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूकदार गुंतवणूक योजनांचा विचार करतात. यामध्ये जर आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा विचार केला तर ही एक गुंतवणुकीच्या दृष्टीने विश्वसनीय अशी संस्था असून देशातील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार एलआयसीच्या वेगवेगळ्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करतात.

एलआयसीच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी अनेक आकर्षक ऑफर्स वेळोवेळी  सादर केल्या जातात व या माध्यमातून गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक फायदा देखील मिळतो व गुंतवणूक देखील सुरक्षित राहते. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये एलआयसीच्या अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी तुम्हाला दररोजच्या दोनशे रुपये बचतीतून लाखो रुपये मिळवून देऊ शकते.

एलआयसीचा जीवन प्रगती प्लान

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी कडून ग्राहकांकरिता अनेक नवनवीन प्लान आणि ऑफर्स सादर केल्या जातात व त्यातीलच एक ऑफर्स किंवा योजना पाहिली तर ती गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीतून खूप लोकप्रिय अशी योजना आहे. एलआयसीच्या या योजनेमध्ये तुम्ही 200 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात

व मॅच्युरिटी वर तुम्हाला तब्बल 28 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप फायद्याची आहे. एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक दिवसाला दोनशे रुपयांची गुंतवणूक जर केली तर एका महिन्यामध्ये तुमचे सहा हजार रुपये या माध्यमातून जमा होतात व एका वर्षात 72 हजार रुपये तुम्ही जमा करू शकतात.

म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला एलआयसीच्या या जीवन प्रगती प्लान मध्ये करायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने वर्षाला 72 हजार म्हणजेच दररोज दोनशे रुपये प्रमाणे जर 20 वर्षापर्यंत रक्कम गोळा केली तर या योजनेच्या मॅच्युरिटी अर्थात परिपक्वतेच्या कालावधी वेळी तुम्हाला चक्क 28 लाख रुपयांचा परतावा यातून मिळतो.

याशिवाय तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून जर ज्याने पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर  इन्शुरन्सची रक्कम तसेच सिपर रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल बोनस असा एकत्रित मिळून एकूण रक्कम संबंधित मृत्यू झालेल्या पॉलिसीधारकाच्या वारसांना मिळते.

अशा पद्धतीने ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याची असून जर तुम्ही देखील एखाद्या चांगल्या गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल तर ही जीवन प्रगती योजना तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याची आहे.