Pension Scheme : दरमहा 42 रुपये जमा करून आयुष्यभर पेन्शन मिळवा; बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension Scheme : तुम्हीही तुमच्या भविष्यासाठी चिंतेत आहात का? जर होय, तर आज आम्ही अशी एक योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चिंता मुक्त होऊ शकता. ही योजना एक सरकारी योजना आहे, जी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आली आहे.

सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. ज्यामध्ये दरमहा सुमारे 200 रुपये गुंतवून तुम्हाला आयुष्यभर 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. अटल पेन्शन या सरकारी योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक 60,000 रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकते.

या योजनेत दरमहा फक्त 210 रुपये जमा करून, तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजेच 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये कमाल पेन्शन मिळू शकते. सध्याच्या नियमांनुसार, 18 वर्षांपासून या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 5,000 रुपये पेन्शन मिळते. यासाठी तुम्हाला  दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.

या योजनेत तुम्ही  दर तीन महिन्यांनी 626 रुपये भरू शकता आणि दर सहा महिन्यांनी रक्कम भरल्यास तुम्हाला 1,239 रुपये द्यावे लागतील. अशातच जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवी असेल तर, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.

अटल पेन्शन योजना काय आहे?

वृद्धापकाळातील उत्पन्नाची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने 2015-16 च्या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना, विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना शक्य तितकी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.

दरमहा ५ हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन !

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ग्राहकांना दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. भारत सरकार किमान पेन्शन लाभाची हमी देते. केंद्र सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या 50 टक्के किंवा वार्षिक 1,000 रुपये, यापैकी जे कमी असेल ते योगदान देते. सरकारी योगदान अशा लोकांना दिले जाते जे कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत आणि करदाते नाहीत. योजनेअंतर्गत 1,000, 2000, 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे. पेन्शनच्या रकमेवरही गुंतवणूक अवलंबून असते. तुम्ही लहान वयात सहभागी झाल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतात.