Post Office : पोस्ट ऑफिसची धमाकेदार स्कीम ! काही वेळातच पैसे दुप्पट…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : कोरोना काळानंतर सर्वांना बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच आता बरेचजण बचतीला जास्त महत्व देत आहेत. लोक बँकेत तसेच वेगवगेळ्या योजनेत पैसे गुंतवत आहेत. अशातच सरकार देखील अनेक बचत योजना ऑफर करत आहे, जिथे गुंतवणूक करून लोक चांगले रिटर्न्स मिळवत आहेत.

सरकारी योजना या बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. तसेच काही योजनांचा परतावा देखील चांगला आहे. आजच्या या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल बोलणार जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला चांगल्या परताव्यासह अनेक फायदेही देते. आज आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे मासिक उत्पन्न योजना. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मासिक उत्पन्न मिळू शकते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतून तुम्हाला स्थिर व्याज मिळते. या योजनेत एफडीप्रमाणेच एकदाच गुंतवणूक करायची आहे. ज्यावर तुम्हाला दरमहा व्याजाच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळते. या योजनेवर जानेवारी ते मार्च २०२३ साठी ७.१ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

ही सरकारी योजना व्याजदरावर आधारित आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर काढली जाऊ शकते किंवा नवीन गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते.

या योजनेत सिंगल खात्यातील कमाल गुंतवणुकीची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल. मात्र, पोस्ट ऑफिस आधीच गुंतवणुकीच्या मर्यादेवर काम करत आहे.

अशा प्रकारे मिळवा मासिक उत्पन्न

पोस्ट ऑफिस मासिक गुंतवणूक योजनेतील नवीन गुंतवणुकीच्या मर्यादेमुळे, संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणे शक्य आहे . येथे, 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, तुम्हाला सुमारे 9 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते. हे उत्पन्न सर्व संयुक्त खातेदारांमध्ये समान प्रमाणात वितरीत केले जाते.

हे व्याज खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिन्यानंतर दिले जाईल. एका खात्यासाठी, 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज उत्पन्न अंदाजे 5325 रुपये असेल. तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 8875 रुपये मासिक व्याज मिळते.