Post Office Scheme : वृद्धापकाळात पैशांचे नो टेन्शन…! ‘या’ योजनेत फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करा अन् लाखो कमवा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Gram Suraksha Scheme : बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचाही समावेश आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. म्हणूनच लाखो लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायला आवडते. कारण येथे कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणूक वृद्धापकाळात तुमच्यासाठी आधार ठरू शकते. पोस्टाच्या या योजनेचे नाव ग्राम शिक्षा योजना असे आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता.

काय आहे ग्राम सुरक्षा योजना?

19 ते 55 वर्षे वयोगटातील लोक या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवण्याची रक्कम 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करता येते.

या योजनेत जो कोणी गुंतवणूक करतो त्याला 80 व्या वर्षी बोनससह परतावा मिळतो. जर एखाद्या व्यक्तीचा वयाच्या 80 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची संपूर्ण गुंतवणूक नॉमिनीला परतावा म्हणून दिली जाते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणत्या सुविधा मिळतात?

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक सुरू करणारी कोणतीही व्यक्ती गुंतवणूक सुरू केल्यानंतर 4 वर्षानंतरच कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकते. ५ वर्षांनंतर गुंतवणुकीवर बोनसही दिला जातो. कोणताही पॉलिसीधारक ही योजना सुरू केल्यापासून तीन वर्षांच्या आत सरेंडर करू शकतो.

दररोज फक्त 50 रुपये वाचवावे लागतील

जर कोणीही व्यक्ती दररोज 50 रुपये बचत करते, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आणि ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करत असेल, तर त्याला वयाच्या 80 व्या वर्षी 35 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.