LIC Claim Process: तुम्हाला आहे का माहिती एलआयसीच्या क्लेम कसा मिळवायचा असतो? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Claim Process:- जर आपण विमा क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. एलआयसीच्या माध्यमातून जर आपण देशाचा विचार केला तर कोट्यावधी लोकांनी पॉलिसी घेतलेल्या आहेत.

अनेक प्रकारच्या आकर्षक विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून सादर केल्या जातात व सोयीनुसार पॉलिसी विकत देखील घेतल्या जातात. परंतु आपण पॉलिसी घेतो. पण बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते की जर दुर्दैवाने एखादी आपत्ती कुटुंबावर कोसळली तर एलआयसी वर दावा म्हणजे एलआयसीकडे क्लेम कसा दाखल करायचा असतो?

त्यामुळे बऱ्याचदा गोंधळ उडतो. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण एलआयसी वर दावा किंवा एलआयसी क्लेम कसा  करावा लागतो? याबाबतची माहिती घेणार आहोत.

 एलआयसी क्लेमची प्रक्रिया कशी आहे?

जर कुटुंबातील पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर मृत्यूचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याकरिता सगळ्यात आगोदर नॉमिनीला एलआयसीच्या होम ब्रांचला भेट देणे गरजेचे असते. म्हणजे ज्या ठिकाणाहून पॉलिसी जारी केली गेली आहे त्या ठिकाणी भेट द्यावी लागते.

त्याठिकाणी गेल्यानंतर पॉलिसी धारकाच्या मृत्यूची माहिती त्यांना द्यावी लागते. त्यानंतर नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये संबंधित निधी म्हणजेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शाखा अधिकारी फॉर्म 3783, फॉर्म 3801 आणि NEFT फॉर्म देतो.

यात आणि सोबत तुम्हाला मृत पावलेल्या व्यक्तीचे मूळ मृत्यू  प्रमाणपत्र, मूळ पॉलिसी बॉण्ड, नॉमिनीचे पॅन कार्ड तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्टची प्रत आणि मृत झालेल्या पॉलिसीधारकाचा कोणताही ओळखीचा पुरावा( जसं की आधार कार्ड ) इत्यादी कागदपत्रे लागतात व ही नॉमिनीला सर्व कागदपत्रे स्व- साक्षांकित करावी लागतात.

 घोषणापत्र देणे गरजेचे

पूर्णपणे भरलेला फॉर्म आणि कागदपत्रांसह नॉमिनीला एक घोषणा पत्र देखील सादर करणे गरजेचे असते. यामध्ये नॉमिनीला संबंधित पॉलिसी धारकाच्या मृत्यूची तारीख, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूचे कारण नमूद करणे गरजेचे असते. NEFT फॉर्मसह नामनिर्देशित व्यक्तीला रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक आणि बँक पासबुकची प्रत सादर करावी लागेल.

यामध्ये बँकेच्या खातेदाराचे नाव तसेच खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफएससी कोड आपल्याला असणे गरजेचे आहे. बँकेच्या पासबुकची छाया प्रत इतर कागदपत्रांसह नसल्यास कागदपत्रे स्वीकारले जात नाहीत.

 क्लेम दाखल करताना या गोष्टी ठेवा लक्षात

वर सांगितलेली कागदपत्रे सादर करताना नॉमिनेटेड व्यक्तीने मूळ कागदपत्रे आपल्याजवळ ठेवावीत. म्हणजे ज्या कागदपत्रांच्या प्रती तो सादर करणार आहेत त्यांच्या मूळ प्रति स्वतःजवळ ठेवणे गरजेचे आहे. पडताळणी करता त्यांचे पॅन कार्ड, मृत व्यक्तीचे ओळखपत्र आणि मूळ पासबुकही ठेवणे गरजेचे आहे.

कारण मृत्यूच्या दाव्यावर प्रक्रिया करण्याकरिता कागदपत्रे मंजूर करण्याआधी एलआयसी अधिकारी मूळ पासबुकच्या प्रति वरून पडताळणी करतात. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कागदपत्रांच्या या यादी व्यतिरिक्त आयुर्विमा महामंडळ अंतिम रक्कम नॉमिनेटेड व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी काही जास्तीचे कागदपत्र देखील मागू शकते.

 क्लेम सबमिट केल्यानंतर पावती घेणे गरजेचे

जेव्हा तुम्ही ही सगळी कागदपत्रे एलआयसी शाखेमध्ये जमा करतात. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून पोहचपाती घ्यायला विसरू नका आणि ती घेतल्यानंतर सुरक्षित ठेवा. जर एलआयसीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली गेली नाही

तर नॉमिनेटेड व्यक्तीच्या बँक खात्यात किंवा त्या व्यक्तीला एक महिन्याच्या कालावधीत सेटलमेंट झालेली रक्कम मिळते. परंतु जर एक महिन्याच्या आतमध्ये रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली नाही तर तुम्ही ती पावती एलआयसी शाखेत घेऊन जावी त्यानुसार तुमच्या क्लेमचे स्टेटस विचारणे गरजेचे आहे.