SBI Bank Update : SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, वाचा काय आहे कारण?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank Update : तुम्हीही SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेने एक सूचना जारी केली आहे. या सूचनांचे पालन न केल्यास भविष्यात होणाऱ्या नुकसानाला बँक जबबाबदार राहणार नाही असे नोटिफिकेशन जारी केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना बनावट कर्ज कॉल्सबद्दल चेतावणी दिली आहे. एसबीआयने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना सांगितले आहे की, “जर कोणी तुम्हाला एसबीआय लोन फायनान्स लिमिटेडशी संपर्क साधण्यास सांगितले. किंवा अशा इतर कोणत्याही कंपनीशी संपर्क साधला तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की त्याचा SBI शी काहीही संबंध नाही. हे लोक आमच्या ग्राहकांना खोट्या कर्जाच्या ऑफर देऊन फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

एसबीआयने असेही म्हटले आहे की, जर कोणाला कर्ज हवे असेल तर त्याने त्याच्या जवळच्या एसबीआय शाखेत जावे आणि मध्यस्थांना प्रोत्साहन देणे टाळावे. बँकेच्या म्हणण्यानुसार अशी कोणतीही कंपनी नाही किंवा बँक कोणाला कर्जासाठी बोलावत नाही.

त्याच वेळी, एसबीआयने तुमचा पॅन तपशील, INB क्रेडेंशियल, मोबाइल नंबर, UPI पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि UPI VPA कोणाशीही शेअर करू नका असे सांगितले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करण्यापूर्वी तो नेहमी दोनदा विचार करा. याशिवाय अशी कोणतीही घटना तुमच्या सोबत घडल्यास https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीबद्दल चेतावणी देत ​​असते. काही दिवसांपूर्वीच बँकेने लोकांना व्हॉट्सॲप कॉल्स किंवा मेसेजबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.

‘या’ गोष्टी टाळाव्यात !

-तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका.

-तुमच्या खात्याचा पासवर्ड वारंवार बदला.

-तुमचा इंटरनेट बँकिंग तपशील कधीही फोन, ईमेल किंवा एसएमएसवर कोणाशीही शेअर करू नका.

-संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका.

-कोणत्याही बँकेशी संबंधित माहितीसाठी नेहमी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून रहा.

-फसवणूक करणाऱ्यांची तक्रार स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना किंवा जवळच्या एसबीआय शाखेत करा.