Success Story: लाखो रुपयाच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि उभारली डाळ मिल! शेती आणि डाळ मिलमधून वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांची

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:- सध्या उच्च शिक्षण घेणारे अनेक तरुण-तरुणी असून त्यामानाने नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे आता बरेच उच्चशिक्षित तरुण-तरुणी व्यवसायांकडे वळत आहेत. परंतु समाजामध्ये आपल्याला असे अनेक व्यक्ती दिसून येतात की ते उच्चशिक्षित आहेतच परंतु त्यांच्याकडे गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या होत्या. लाखोंमध्ये मिळणारे वार्षिक पॅकेज होते.

परंतु तरी देखील त्यांनी नोकऱ्या सोडल्या व व्यवसायांमध्ये पडले व यशस्वी देखील झालेत. यातील काही जण तर शेतीसारख्या बिन भरवशाच्या समजल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये येऊन देखील प्रचंड प्रमाणात यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते.

अगदी याच पद्धतीने जर आपण  नागपूर येथील प्रमोद गौतम यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी एमबीए आणि इंजीनियरिंग पूर्ण केलेले आहे व एवढेच नाही तर आयआयटी आणि आयआयएम मधून पदवीधर आहेत. सर्वाधिक पगार मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये गौतम यांच्या नावाचा समावेश आहे.

परंतु यापेक्षा काहीतरी चांगले आणि वेगळे करावे ही इच्छाशक्ती मनात असल्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला व त्यासोबतच डाळ उद्योगांमध्ये ते पडले. आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर एक कोटीच्या पुढे आहे.

 नोकरी सोडून शेती आणि डाळ मिल उद्योगामध्ये मिळवले यश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद गौतम हे नागपूरचे रहिवासी असून  त्यांनी आयआयटी आणि आयआयएम मधून एमबीए आणि इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे व सर्वाधिक पगार असलेल्या पदावरती नोकरी करत होते.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनीयर म्हणून नोकरीला होते. परंतु नोकरीमध्ये त्यांचे मन काही केल्या रमत नसल्यामुळे काहीतरी वेगळे करावे असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यामुळे त्यांनी 2006 मध्ये नोकरीला रामराम ठोकला व शेती करण्याचा अगोदर निर्णय घेतला.

कारण त्यांच्याकडे घरचीच 26 एकर वडिलोपार्जित मालकीची जमीन होती.त्यामुळे नोकरी सोडून शेती करावी आणि काहीतरी व्यवसाय करून उद्योजक व्हावे हा त्यांचा मानस होता.

 अशा पद्धतीने केली शेतीला सुरुवात

सुरुवातीला प्रमोद गौतम यांनी फलोत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना माहिती होते की ग्रीन हाऊस मध्ये फळे आणि भाजीपाला पिकवणे ही एक कला असून या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये भुईमूग आणि हळद पिकांच्या लागवड करण्यापलीकडे जात अगोदर मुगडाळ तयार करण्याचा निर्णय घेतला

व त्याकरिता मुगाची लागवड करण्याचे ठरवले. या माध्यमातून मुगाची डाळ निर्मिती करण्याचे ठरवले व पॉलिश न केलेली आणि भेसळ नसलेली मुग डाळ त्यांनी तयार केली. त्याकरिता नागपूर या ठिकाणी त्यांनी या व्यवसायाची वाढ करत वंदना फूड्स नावाचा स्वतःचा डाळीचा बँड सुरू केला व या माध्यमातून विविध प्रकारच्या डाळी आणि धान्याची विक्री ते आज करतात.

एवढेच नाही तर त्यांनी पॅकेज केलेले धान्य वंदना फूड्स या ब्रँड खाली अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लेटफॉर्मवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. आजच्या परिस्थितीत त्यांच्या डाळमिलची वार्षिक उलाढाल पाहिली तर ती एक कोटी रुपये इतकी आहे.

तसेच शेतीमधून देखील ते दहा ते बारा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवत आहेत. हे सगळे एकूण आर्थिक उत्पन्न पाहिले तर त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कमाई पेक्षा हे जास्त आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की इच्छाशक्ती आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी व्यक्तीमध्ये राहिली तर व्यक्ती यशस्वी होतोच होतो.