कोण आहेत भारताचे नवे वॉरेन बफे? नोकरी सोडून शेअर बाजारातून कमविली कोट्यावधीची संपत्ती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story: बरेच व्यक्ती स्थिरस्थावर जीवन आणि रुळलेला मार्ग सोडून काहीतरी अल्लड करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यवसायामध्ये उडी घेतात. त्यानंतर मात्र बऱ्याचदा खाचखडगे आणि अनंत अडचणींचा सामना देखील करतात. एकदा ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींची वाटेल ते करण्याची तयारी असते आणि ते करतात व यशस्वी होतात. अगदी याच पद्धतीने जर आपण शेअर बाजाराचा विचार केला तर अनेक व्यक्ती शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात. परंतु यामध्ये प्रत्येक जण चांगले यश मिळवतात असे नाही.

जे योग्य रीतीने पूर्णपणे अभ्यास करून आणि कौशल्य संपादन करतात असेच व्यक्ती यामध्ये यश मिळवू शकतात. आपण जर शेअर बाजारातील दिग्गजांचा विचार केला तर यामध्ये वॉरन बफे तसेच राकेश झुनझुनवाला यांची नावे डोळ्यासमोर येतात. या व्यक्तींनी काही हजार रुपयांमध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि आज ते कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. या यशामागे त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांचे कौशल्य कारणीभूत असते.

याच पद्धतीने जर आपण भारतातील एका व्यक्तीचा विचार केला तर त्यांनी चक्क नोकरी सोडली व शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम पत्करली. परंतु यामध्ये यशस्वी होत त्यांनी मल्टीबॅगन शेअरची ओळख करून मोठा फंड जमा केला आहे. या व्यक्तीचे नाव आहे मनीष गोयल.

 मनीष गोयल यांची माहिती?

मनीष गोयल यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहिली तर ते चार्टर्ड अकाउंटंट होते व त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये यासंबंधीचे काम केले. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत असताना शेअर बाजारातील गुंतवणुकीशी त्यांचा जवळचा संबंध आला व पुढे जात त्यांनी या क्षेत्रामध्येच करिअर करण्याचे ठरवले व ते आज एक शेअर बाजारातील प्रसिद्ध चेहरा  म्हणून पुढे आले आहेत.

जेव्हा ते सीए झाले तेव्हा त्यांनी 2006 मध्ये रणबॅक्सी लेबोरेटरीज लिमिटेड मध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी केली आणि 2010 पर्यंत त्या ठिकाणी त्यांनी काम केले. परंतु स्वतःमध्ये असलेले सुप्त गुण आणि कौशल्य त्यांनी ओळखले होते व त्या अनुषंगाने त्यांनी शेअर गुंतवणूकदार म्हणून करिअर करण्यास सुरुवात केली.

या माध्यमातून त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना कोणते शेअर खरेदी करावेत आणि कोणते करू नयेत याबाबत सल्ला द्यायला सुरुवात केली व त्यांचे आता एक स्वतःची वेबसाईट आहे व त्या माध्यमातून ते शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकी संबंधी महत्त्वपूर्ण सल्ला देतात.

 मनीष गोयल यांचा पोर्टफोलिओ

जर आपण काही प्रसिद्ध मीडिया रिपोर्टचा अहवाल पाहिला तर त्यानुसार मनीष गोयल यांनी के पी आर मिल्स, चमन लाल सेठिया एक्सपोर्ट, मोल्डटेक पॅकेजिंग, स्विस ग्लासकोट सारख्या मल्टीबॅगर्स शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रचंड प्रमाणात पैसा कमावण्यास मदत केली. एवढेच नाही तर 2016 मध्ये त्यांनी स्वतःचे टेलिग्राम ब्रॉडकास्ट चैनल देखील सुरू केले व या माध्यमातून लोकांना ते यशस्वी गुंतवणूकदार आणि उद्योजक बनवण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत.

 किती आहे मनीष गोयल यांची संपत्ती?

जर आपण 30 जून 2023 साठी दाखल करण्यात आलेल्या कार्पोरेट शेअर होल्डिंग नुसार विचार केला तर त्यांची संपत्ती 21.4 कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्ती सह दोन सार्वजनिक पणे ट्रेड केलेल्या कंपन्यांच्या स्टॉकचे देखील ते मालक आहेत.

अशा पद्धतीने स्वतःतील गुण ओळखून अनेक कौशल्याचा आणि बुद्धीचा वापर करत व्यक्ती असामान्य यश मिळवू शकतो हे मनीष गोयल यांच्या उदाहरणावरून दिसून येते.