Sukanya Samriddhi Yojana:  सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भवितव्यासाठी आहे फायद्याची! वाचा किती पैसे गुंतवल्यास किती मिळेल फायदा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांकरिता खूप अशा महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून संबंधित घटकांचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून विकास होईल हा त्यामागचा उद्देश आहे.

याच पद्धतीने जर आपण मुलींचा विचार केला तर मुलींचा जन्मदर वाढावा आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्यांचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा याकरिता देखील सरकारच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित आहेत. यामध्ये जर महाराष्ट्र राज्य सरकारचा विचार केला तर लेक लाडली योजना हे एक उत्तम उदाहरण देता येईल.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही देखील मुलींच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण अशी योजना असून मुलीच्या जन्म झाल्यानंतर जर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली तर या योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो व त्या पैशांचा वापर तुम्ही मुलीचे शिक्षण, लग्नकार्य इत्यादी गोष्टींसाठी करू शकतात. याच अनुषंगाने या लेखांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही किती पैसा गुंतवल्यास त्यावर तुम्हाला किती फायदा मिळेल? यासंबंधीची माहिती घेऊ.

 सुकन्या समृद्धी योजनेत किती पैसे गुंतवल्यावर किती मिळतो फायदा?

समजा मुलीचा जन्म झाला व जन्म झाल्यापासूनच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर मुलगी जेव्हा एकवीस वर्षाचे होते तेव्हा तिच्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचा आर्थिक फंड जमा करू शकतात. याकरिता तुम्ही जर…

1- 1 हजार रुपये गुंतवले तर समजा तुम्ही या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवले तर एका वर्षामध्ये तुमचे 12 हजार रुपये जमा होतात. जर यामध्ये तुम्ही समृद्धी योजनेचे कॅल्क्युलेटर नुसार पाहिले तर पंधरा वर्षाच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक  एक लाख 80 हजार रुपये होते व त्यावर तुम्हाला तीन लाख 29 हजार 212 रुपये व्याज मिळते. असे मुद्दल आणि व्याज मिळून  ही योजना परिपक्व झाल्यानंतर 5 लाख 9212 रुपये मिळतील.

2- 2 हजार रुपये जमा केले तर समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर एका वर्षामध्ये तुमचे 24 हजार रुपये जमा होतात. या योजनेच्या कालावधीत म्हणजेच पंधरा वर्षात तुमचे जवळपास तीन लाख 60 हजार रुपये या योजनेमध्ये गुंतवणूक होईल व व्याजाचे उत्पन्न हे सहा लाख 58 हजार 425 रुपये पर्यंत असेल. आपल्याला परिपक्वतेनंतर व्याज आणि मुद्दल अशी एकूण रक्कम जवळजवळ दहा लाख 18 हजार 425 रुपये मिळेल.

3- 3 हजार रुपये गुंतवणूक केली तर सुकन्या समृद्धी मध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये 36 हजार रुपये जमा होतात व या योजनेच्या कालावधीत संपूर्ण गुंतवणूक ही पाच लाख 40 हजार रुपये होते. या गुंतवणूकीवर तुम्हाला नऊ लाख 87 हजार 637 रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे व्याज आणि मुद्दल मिळवून तुम्हाला 15 लाख 27 हजार 637 रुपये मिळतात.

4- 4 हजार रुपये गुंतवणूक केली तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला चार हजार रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये 48 हजार रुपये तुमचे जमा होतात. या योजनेचा कालावधी म्हणजेच पंधरा वर्षांमध्ये तुमची एकूण रक्कम सात लाख वीस हजार रुपये गुंतवणूक केली जाते. यावर तुम्हाला 13 लाख 16 हजार 850 रुपये व्याजातून उत्पन्न मिळते. योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्ही 20 लाख 36 हजार 850 रुपये या माध्यमातून मिळवू शकतात.

5- 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांचे गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये साठ हजार व पंधरा वर्षात नऊ लाख रुपयांचे गुंतवणूक होते. या गुंतवणुकीवर तुम्हाला 16 लाख 46 हजार 62 रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे व्याज व मुद्दल मिळून तुम्हाला ही योजना परिपक्व झाल्यानंतर 25 लाख 46 हजार 62 रुपये मिळतात.

 सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कुठे कराल?

तुम्हाला देखील तुमच्या मुलीचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करू शकतात.