Superb Business Idea: तुमच्याकडे बाईक आणि स्मार्टफोन असेल तर ‘हा’ व्यवसाय करून महिन्याला कमवा 50 हजार! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Superb Business Idea:- आजची परिस्थिती पाहिली तर सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. त्यामुळे आजकाल तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक छोट्या-मोठे व्यवसाय करणे ही आता काळाची गरज बनली आहे.

आता व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे गुंतवणूक म्हणून त्यासाठी देखील आपल्याला पैसा लागतोच. परंतु असे अनेक व्यवसाय आहेत की ती लोकांची गरज आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला करता येऊ शकतात.

याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये तुमच्याकडे बाईक आणि स्मार्टफोन असेल तर तुम्हाला एक चांगली कमाई करता येईल अशा व्यवसायाविषयी माहिती बघणार आहोत. या व्यवसायाला प्रामुख्याने वैद्यकीय कुरिअर सेवा म्हणून ओळखले जाते. नेमका हा व्यवसाय कसा करायचा असतो? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 कसा असतो वैद्यकीय कुरिअर सेवा व्यवसाय?

वैद्यकीय कुरिअर सेवा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे बाईक आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे व या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला खूप चांगल्या पद्धतीने कमिशन बेसवर कमाई करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला बाईकवर काही संपूर्ण शहरांमध्ये फिरण्याची गरज भासत नाही.

यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणाहून काही सेवांसाठी म्हणजेच वैद्यकीय सेवांसाठी फोन येतो त्या ठिकाणी जाऊन  संबंधित सेवा द्यावी लागते व त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात. आजकाल आपल्याला माहित आहे की नोकरीसाठी अनेक लोक शहरांमध्ये राहतात. कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही नोकरीला असतात.

अशा कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक देखील असतात परंतु ते घरी एकटे पडतात. सध्या न्यूक्लिअर फॅमिलीचा कल देखील वाढताना आपल्याला दिसून येत असल्यामुळे अशा परिस्थितीत घरात अनेक जण एकटेच राहतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेक व्याधी असतात व त्यांना नियमितपणे औषध घेणे गरजेचे असते.

परंतु घरी पती-पत्नी किंवा इतर लोक नोकरीच्या कामानिमित्त दिवसभर घराच्या बाहेर असतात व अशा प्रसंगी बऱ्याचदा घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले औषधे संपतात. अशावेळी त्यांना हवी असलेली औषधे त्यांना विकत आणून द्यायला कोणीही नसते. नेमकी हीच परिस्थिती तुम्हाला या व्यवसायामध्ये पैसा कमवून देते.

त्यामुळे वैद्यकीय कुरिअर सेवेमध्ये तुम्हाला क्लाइंट कडून जाऊन डॉक्टरांचे औषधांची प्रिस्क्रीप्शन घ्यावी लागते व त्यांना हवी असलेले औषधे मेडिकल दुकानातून घेऊन त्यांना ते पोहोचवावे लागतात. तसेच डॉक्टरांचे हे प्रिस्क्रिप्शन तुम्ही whatsapp किंवा ईमेलच्या माध्यमातून देखील तुमच्याकडे मागवू शकतात. ही औषधे खरेदी करून तुम्ही ग्राहकांपर्यंत ते पोहोचवणे गरजेचे असते.

 या सेवेबद्दल तुम्हाला कसे मिळतात पैसे?

यामध्ये तुम्ही जेव्हा औषध वितरण करतात किंवा औषध पोहोचवतात तेव्हा तुम्ही दिलेल्या या सेवेकरता तुम्हाला पैसे दिले जातात. परंतु तुम्ही जेव्हा तुमच्याकडे क्लाइंट वाढतात तेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट मेडिकल स्टोर मधून दररोज औषधांची खरेदी करतात तेव्हा तुम्हाला क्रेडिट आणि कमिशन देखील संबंधित मेडिकल स्टोर कडून दिले जाते.

तसेच मेडिकल स्टोरची बिले आणि सेवा शुल्क ग्राहकांकडून देखील तुम्हाला मिळते. या साध्या आणि सोप्या व्यवसाय मध्ये तुम्हाला संबंधित ग्राहक आणि मेडिकल स्टोअर्स या दोन्ही माध्यमातून कमाई करण्याची संधी मिळते.

विशेष म्हणजे तुमचा या व्यवसायाची जाहिरात तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून करू शकतात व तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. कालांतराने हळूहळू  हा व्यवसाय तुमचा खूप मोठा होऊ शकतो व तुम्ही महिन्याला पन्नास हजार ते एक लाखापर्यंत कमाई देखील या माध्यमातून करू शकतात.