Upcoming IPO : आयपीओ खरेदीसाठी व्हा सज्ज! पुढील महिन्यात उघडणार सौरऊर्जेपासून ते आयटी कंपनीचे आयपीओ, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Upcoming IPO : तुम्हीही आयपीओ खरेदीसाठी आयपीओ शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जुलै महिन्यामध्ये सेन्को गोल्ड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसह अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. तसेच आता पुढील महिन्यात आणखी आयपीओ बाजारात येणार आहेत.

जुलै महिन्यात बाजारात आलेल्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पुढील महिन्यात देखील नवीन आयपीओ येणार असल्याने गुंतवणूकदारांना आणखी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आणखी नवीन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तसेच नवीन आयपीओ खरेदी करताना तुमच्या तज्ज्ञांचा नक्की सल्ला घ्या. तसेच त्या आयपीओमध्ये गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या.

ऑगस्टमध्ये कोणत्या कंपन्यांचे IPO येणार आहेत?

ओरियाना पॉवर IPO

1 ऑगस्ट रोजी ओरियाना पॉवरचा आयपीओ उघडणार आहे. गुंतवणूकदार या आयपीओमध्ये ३ ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ओरियाना पॉवर ही कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रात काम करते.

या आयपीओची किंमत 115 ते 118 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांसाठी या आयपीओचे अँकर बुक 31 जुलै रोजी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.

विंसिस आईटी सर्विसेज आईपीओ

तुम्हीही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये विंसिस आईटी सर्विसेज कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. हा आयपीओ 1 ऑगस्ट रोजी उघडला जाणार आहे.

विंसिस आईटी सर्विसेज आईपीओची किंमत 121 रुपये ते 128 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या IPO अंतर्गत कंपनीकडून 38.9 लाख शेअर्स विकले जातील. कंपनी आयपीओद्वारे 49.84 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

विन्सेस आयटी सर्व्हिसेस कंपनीचे 2022-23 या आर्थिक वर्षात उत्पन्न 157.30 कोटी रुपये होते. तर त्यातील नफा 16.02 कोटी रुपये होता. तुम्हालाही नवीन आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पुढील महिन्यात आयटी कंपनीच्या आयपीओमध्ये किंवा सोलर एनर्जीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.