SBI Offer: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर 31 मार्चपर्यंत घ्या ‘या’ ऑफरचा फायदा! होईल आर्थिक फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Offer:- 31 मार्च 2024 हा या आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असून आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना खूप महत्त्वाचा असतो. या महिन्याच्या अखेरपर्यंत पैशांच्या संबंधित अनेक महत्त्वाचे कामे पूर्ण करणे गरजेचे असते.

तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर भरण्याच्या संदर्भात देखील हा महिना खूप महत्त्वाचा असतो व त्यामुळेच जे काही करदाते असतात ते करात सुट किंवा कर वाचवण्यासाठी  अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात व अशाच प्रकारे तुम्ही देखील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल

तर त्याकरिता देखील 31 मार्च ही शेवटची संधी आहे. याचा अनुषंगाने जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही योजनांचा विचार केला तर त्या एसबीआय च्या ग्राहकांसाठी खूप फायद्याच्या अशा योजना आहेत.

परंतु या योजनांची अंतिम मुदत ही 31 मार्चपर्यंत असल्यामुळे  या तारखेपर्यंतच एसबीआयच्या ग्राहकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांचा घ्या लाभ

1- एसबीआय अमृत कलश योजना ही स्टेट बँक ऑफ इंडियाची एक महत्त्वाची एफडी योजना असून यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. आर्थिक दृष्टिकोनातून या योजनेचा फायदा बघितला तर बँक या योजनेच्या अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर 7.10 टक्के व्याज देते

व यामध्ये चारशे दिवसांच्या एफडीचा देखील समावेश आहे. त्या योजनेचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना या योजनेच्या माध्यमातून मासिक, त्रैमासिक, सहामाही व्याजाचा लाभ मिळु शकतात.

2- एसबीआय WeCare एफडी योजना स्टेट बँकेच्या या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंतच आहे.

या योजनेच्या माध्यमातून देखील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर आकर्षक असे व्याज देण्यात येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे स्टेट बँक या योजनेतील कोणत्याही एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज देते.

साधारणपणे स्टेट बँकेच्या या योजनेचा व्याजदर 7.50% इतका आहे. या योजनेत किमान पाच वर्ष आणि कमाल 10 वर्ष इतका कालावधी करिता गुंतवणूक करावी लागते.

4- एसबीआय होम लोन व्याजदर सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला देखील जर होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही ते स्टेट बँकेकडून 31 मार्च 2024 पर्यंत घेतले तर बँकेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या होम लोन वर ऑफर देण्यात येत आहे.

या ऑफर अंतर्गत जा ग्राहकांचा सिबिल स्कोर साडेसातशे ते आठशे पेक्षा जास्त आहे त्यांना  ८.६० टक्के दराने होम लोन दिले जाणार आहे. इतर वेळी गृह कर्जाचा व्याजदर 9.15% आहे.