‘या’ बँकेचे लोन झाले एकदम स्वस्त जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,2 जून 2020सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकतीच आपल्या व्याजदरात कपात केली. आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची असणारी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह कर्जे आणि वाहन कर्जे देणार आहे. पंजाब नॅशनल बँकने सोमवारी कर्जावरील रेपो दरात 0.40 टक्के सूट जाहीर केल्याने नवीन व्याजदर … Read more

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ; एकाच वेळी करता येणार 50 जणांना विडिओ कॉल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : लॉक डाउनच्या काळात सोशल मीडियावर होणाऱ्या वाढत्या मिटींग्स पाहता विविध अँप ने व्हिडीओ कॉलिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गुगल मीट, झूम मीट आदींद्वारे व्हिडीओ कॉल केले जाऊ लागले . आता काही दिवसांपूर्वी फेसबुकने सुरु केलेल्या मेसेंजर रुम्स फीचरची सुरुवात व्हॉट्सअ‍ॅप साठी देखील सुरू केले आहे. यातून युजर एकाचवेळी … Read more

पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गोधेगावची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या ५३ वर्षीय कोरोना बाधितावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. त्यामुळे … Read more

सध्याच्या काळात प्रेग्नसी टाळण्याचा सल्ला

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :सध्या कोरोनाच्या आजारामुळे सर्व नागरिक धास्तावले आहेत. विशेषतः या काळामध्ये प्रेग्नसीमध्ये असणाऱ्या महिलांमध्ये गुंतागुंतीचे प्रकार वाढले. त्यामुळे फैलावाच्या काळात गर्भधारणा झाल्यास काही आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होईल का, अशी भीती अनेक दाम्पत्यांना सतावत असल्याचे निरीक्षण प्रसूतितज्ज्ञांनी नोंदविले आहे. यापासून दूर राहायचे असल्यास गर्भनिरोधकांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक! ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-पुणे : केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. परंतु ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल … Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शहरातील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ठोक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी. तर शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी भाजी व फळ बाजार पुर्वीप्रमाणे मुख्य मार्केटमध्ये भरविण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्या … Read more

भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासह बाजारतळ येथील दुकान उघडण्यास आमदार जगतापांचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भिंगार छावणी परिषद येथील बाजारतळ मधील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. सदरील बाजारतळ उघडण्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी शुक्रवार दि.5 जून पासून आठवडे बाजार न भरवता … Read more

सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर(प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीत अस्वच्छतेने नागरिक त्रस्त असून, सेप्टिक टँकच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने या परिसरात स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मनपाचे उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, विनोद गायकवाड, राजू पवार, बाळू कसबे, सुरेखा … Read more

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्य संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने पोलीस उपाधिक्षकांना निवेदन

अहमदनगर(प्रतिनिधी)- ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक पुरुषोत्तम सांगळे यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करुन त्याची शहराबाहेर बदली करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्य संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक … Read more

विद्यार्थी वाहतुकदारांना सर्व प्रकारच्या कर व फी मध्ये सूट द्यावी -संजय आव्हाड

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालय गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकदारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. विद्यार्थी वाहतुकदारांना आधार देण्यासाठी वाहनांचे सर्व प्रकारचे कर व फी मध्ये सूट देण्याची मागणी शहर वाहतुक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण … Read more

‘सावधान! सॅनिटायझरच्या अतिवापराने उद्भवतील त्वचारोग

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारची काळजी घेतली जाते. सध्या यावर लस उपलब्ध नसल्याने स्वरक्षण आणि स्वच्छता व सोशल डिस्टंस हे महत्वाचे नियम सांगितले आहेत. त्यामुळे स्वच्छता राखण्यसाठी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे. … Read more

पॅरासिटामॉल गोळीसंदर्भात केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर सर्वात आधी भारतात पॅरासिटामॉल औषध घेण्याची परंपरा आहे. बहुतांश भारतीय वर्षभरात किमान एकदा तरी पॅरासिटामॉल औषधाचे सेवन करतात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पॅरासिटामॉलसह काही औषधे आणि औषधांच्या निर्यातीवर प्रतिबंध आणण्यात आले होते. मात्र आता पॅरासिटामॉलच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे. पॅरासिटामॉल आरोग्याला अपायकारक असल्याचं सांगत केंद्र … Read more

दिलासादायक ! कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढले असून ४३.३५ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण … Read more

कौतुकास्पद! आधी कर्तव्य मग आईवर अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांच्या या महान कार्यामुळे आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अशीच एक घटना कल्याण शहरात घडली. येथील एका डॉक्टर्सने आपल्या आईच्या मृत्यूपेक्षाही आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केल्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील गर्भवती महिला … Read more

कोरोना योद्ध्याच्या लेकीचे भावुक उद्गार, म्हणाली बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-मध्य प्रदेशातील जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा महिनाभरापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपुणामुळे मृत्यू झाला. या कोरोना योद्ध्याच्या निष्पाप मुलांनी सीएम शिवराजसिंह चौहान यांना पत्र आणि व्हिडीओ पाठवून मदतीची हाक दिली आहे. दिवंगत ड्रायव्हर योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई यांना कोरोनाची लागण झाली … Read more

अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले ‘हे’ आश्वासन

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असतानाच आता नैसर्गिक संकट घोंगावत आहे. ‘ निसर्ग ‘ चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसेल अशी शक्यता असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज्याने संभाव्य … Read more