ताणतणाव चांगला की वाईट ?

नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन ‘अचपळ मन माझे। धावरे धाव … Read more

केंद्र आर्थिक व्यवस्थापनात अपयशी – पी. चिदंबरम

हैदराबाद : अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे. ‘केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्याची आपली योग्यता नसून, याविषयी आपण असाहाय्य बनल्याचे सिद्ध केले आहे,’ असे ते म्हणालेत. ‘मोदी सरकारची अवस्था रुग्णाचा आजार शोधून त्यावर प्रभावी उपचार करण्यात अपयशी ठरलेल्या … Read more

बहुप्रतीक्षित केजीएफ 2 मध्ये रवीना टंडन

अभिनेते यश यांचा बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित केजीएफ 2 म्हणजेच कोलार गोल्ड फिल्डस् या चित्रपटाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केजीएफ 2 चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन महत्वाची भूमिका बजावणार आहे. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर याबाबत चित्रपटाच्या निर्मिती चमूने ट्विटर द्वारे माहिती दिली. रवीना टंडन यांनी केजीएफ 2 च्या चित्रीकरणासाठी सुरवात केलेली आहे.  अभिनेते संजय दत्त यांच्यानंतर … Read more

राज्य सरकारने फुकटचा धंदा करू नये – अजित पवार

पुणे :- दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करण्याच्या योजनेवर सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये असा सल्ला त्यांनी पुण्यात दिला. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज … Read more

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात उघड झाला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल … Read more

कोरोना विषाणू विरोधातील लोकलढ्याचा क्रूर चेहरा जगासमोर

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकट्या चीनमध्ये कोरोनोचे ७२२ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. जगभरात जवळपास ३४,८०० जणांना लागण झाली आहे. यापैकी ३४,५४६ जण हे एकट्या चीनमधील आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून २५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मकाऊमध्ये १० रुग्णांवर … Read more

माथेफिरू सैनिकाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ जण ठार

बँकॉक : थायलंडच्या ईशान्येकडील कोरात शहरामध्ये एका माथेफिरू सैनिकाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जवळपास १७ जण ठार झाले, तर १५ हून अधिक जण जखमी झाले. माथेफिरूने अनेक जणांना शॉपिंग मॉलमध्ये ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सैनिकाला पकडून बंधकांना सोडवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सैनिकाने सुरुवातीला अन्य एका सैनिकाची हत्या केल्यानंतर मॉलच्या पार्किंग परिसरात बेछूट … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार !

मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. “पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स” द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि … Read more

राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

मुंबई : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. शनिवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद साताऱ्यात ११.६ अंश सेल्सिअस करण्यात आली. मागील तीन ते चार दिवस पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा … Read more

माजी आमदार विजय औटी यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी!

 पारनेर : मला जिल्हा परिषदेत समिती मिळाल्याचे सर्व श्रेय माजी आ.औटी यांना आहे. या समितीत काम करताना अगदी थोडा कालावधी आहे, परंतु पारनेर तालुक्याला बांधकाम समितीची संधी पहिल्यांदाच मिळाली म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितच जास्त आहे. त्या पूर्ण करताना मी कोठेही कमी पडणार नाही याची खात्री आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती … Read more

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव 9 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ३०० – ५००, वांगी ५०० – १५००, फ्लावर ८००- १०००, कोबी २०० – ४००, काकडी ४०० – ८००, गवार ७००० – ९०००, घोसाळे १५०० – २०००, दोडका २००० – ३०००, कारले १००० – २५००, भेंडी २५०० – ३०००, वाल १००० – १५००, घेवडा … Read more

नगर-औरंगाबाद रोडवरील अपघातात महिलेचा मृत्यू 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनचालकाने जोराची धडक दिल्याने तान्हुबाई रघुनाथ कोकाटे (रा.देसवंडी, ता.राहुरी) या जखमी होवून मृत्यूमुखी पावल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. नवनाथ मच्छिंद्र म्हस्के (वय ३५, रा.धनगरवाडी) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात … Read more

स्वच्छतेचे वळण लावण्यासाठी तब्बल सोळा हजार रुपयांचा दंड वसूल !

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी होत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेसा जनजागर करीत कृतिशील मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, काही नाठाळांना स्वच्छतेचे वळण लागण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत शहरातील तीनही बसस्थानकात रापमंच्या नियंत्रकांनी दंडात्मक कारवाया केल्या. तब्बल सोळा … Read more

श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड

कोपरगाव : विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या कार्यकाळात भरघोस निधी मंजूर करुन आणत झालेली आहेत. अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर झालेला होता. जो निवडणुक प्रक्रियेनंतर विकासकामांसाठी जाणार होता. मात्र ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघाती आरोप कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे … Read more

पाणी उपसा करणाऱ्या त्या शेतकऱ्यांवर कारवाई

नेवासा : नेवासा तालुक्यात जायकवाडी धरणाच्या पाणी फुगवट्यातून प्रवरा संगम, म्हाळापुर परिसरातून विना परवाना पाणी उपसा करणाऱ्या ६ मोटार पंप व १७ स्टार्टरची जप्ती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जलाशय फुगवटा नेवासा शाखा, महसूल, महावितरण कंपनी व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत दि. ७ रोजी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई ३० सप्टेंबरपर्यंत … Read more

‘त्या’ बिबट्याचा धुमाकूळ सुरुच नागरिकांत पसरली दहशत

श्रीरामपूर :- तालुक्यातील गळनिंब व उक्कलगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. मारकड वस्तीशेजारील भागात ठिकठिकाणी सात नवीन पिंजरे लावण्यात आले असून वन विभागाची टीमही याठिकाणी ठाण मांडून आहे; मात्र बिबट्या या सर्वांना हुलकावणी देत आहे. त्यामुळे परिसरता दहशत पसरली आहे. बिबट्याने चिमुकलीला ठार केल्यानंतर गळनिंब परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात सात पिंजरे … Read more

बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला  !

श्रीरामपूर :- तालुक्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी बेमोसमी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. काल श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला.  तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी व नागरीकांची उडाली धांदल

संगमनेर :- तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चागलीच धांदल उडाली.  गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी थंडी वाजत होती, तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला … Read more