आता आमदार मिलिंद नार्वेकर यांचा नंबर ! लवकरच ठाकरे गट सोडणार ?

२ जानेवारी २०२५ मुंबई: शिवसेना पक्षात फूट पाडून मूळ शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला सुरंग काही थांबता थांबत नसून रोज नवनवी नावे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले.त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’तून सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय येणार, … Read more

सांधे प्रत्यारोपण : सर्जरीबद्दल असलेले गैरसमज, साइड इफेक्ट्स…

सांधे प्रत्यारोपण सर्जरी आजच्या काळातील एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. याबद्दलच्या गैरसमजांमुळे रुग्ण योग्य वेळी उपचार घेण्यास टाळतात. तसेच रोबोटिक सर्जरी या तंत्रज्ञानामुळे सर्जरीची अचूकता आणि सुरक्षा वाढली आहे. योग्य सल्ला घेऊन, योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांधे प्रत्यारोपण सर्जरी रुग्णासाठी एक जीवनभराचा आराम देऊ शकते. सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आणि … Read more

नवीन वर्षात कर्ज स्वस्त होणार कि नाही ? आर्थिक वाढीला वेग मिळणार ?

जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारताला भौगोलिक आव्हानांना सामोरे जावे लागेल, महागाई नियंत्रित करावी लागेल, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला त्याचा खर्च वाढवण्यासाठी चालना द्यावी लागेल. कारण, सप्टेंबरच्या तिमाहीत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था मंदीला मागे टाकत असून नवीन वर्षात आणखी चांगली सकारात्मक कामगिरी करण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. २०२४-२५ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) उच्च-वारंवारता … Read more

देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींकडून नववर्षाची भेट ! पीक विमा योजनांना आणि खतांच्या किमती…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दोन पीक विमा योजनांचा अजून एका वर्षासाठी विस्तार करण्यात आला आहे. तसेच डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १,३५० रुपये दराने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ३,८५० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. प्रमुख … Read more

मुलीला मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकाने कोयता आणि कुऱ्हाडीने मुंडके छाटले; हाती घेत पोलीस ठाणे गाठले…

२ जानेवारी २०२५ : घरातून पळून जाण्यासाठी मुलीला मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकाने कोयता आणि कुऱ्हाडीने एकाचे शिर छाटले.त्यानंतर हे तुटलेले मुंडके घेऊन दोघांनीही थेट पोलीस चौकी गाठली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (१ जानेवारी) ननाशी (ता. दिंडोरी) येथे घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावात तणावाचे वातावरण असून, तेथे एसआरपीच्या तुकड्या व पेठ, दिंडोरी, बाहे, … Read more

सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर तयार होणार कि नाही ? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

२ जानेवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात एमएसआरडीसीने १० ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पाच्या डीडीपीसाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. या सूचना व हरकतींना ९०० जणांनी प्रतिसाद दिला असून त्यात १० टक्के प्रतिसादकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे, तर याव्यतिरिक्त इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून विकसित करण्यात … Read more

बिग ब्रेकिंग ! प्रजासत्ताक दिनाची शाळांची सुट्टी रद्द ! शाळेत दिवसभर…

२ जानेवारी २०२५ : राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मात्र, यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती … Read more

भारतासाठी २०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ; जानेवारीत असे असेल हवामान…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : २०२४ हे भारतासाठी १९०१ सालापासूनचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. गतवर्षात सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस अधिक होते.यापूर्वी २०१६ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी बुधवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार २०२४ वर्षात संपूर्ण भारतात वार्षिक सरासरी भू पृष्ठभाग … Read more

नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी कुणाचा होईल फायदा? कुणाचे होऊ शकते नुकसान? जाणून घ्या गुरुवारचे राशी भविष्य

horoscope

2 january 2025 Horoscope:- आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी 2025 असून सगळ्यांनी आज नवीन वर्षाचे स्वागत केले व अनेक नवनवीन गोष्टी करण्याचा संकल्प देखील केला असेल. म्हणजे आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि उद्या 2 जानेवारी 2025 वार गुरुवार असून हा नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे या नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी … Read more

Ahilyanagar News : शनिवारपासून अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. दर शनिवारी शहराच्या एकेका भागात अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले … Read more

2025 मध्ये ‘या’ पैशांविषयीच्या टिप्स बनवतील तुम्हाला श्रीमंत! चांगल्या प्रकारे जमा होईल तुमच्याकडे पैसा

financial tips

Financial Tips:- आयुष्यामध्ये आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे कमवत असतो व त्या माध्यमातून आपण श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमवतो परंतु मात्र आपल्याकडे हवा तितका पैसा राहत नाही.तेव्हा श्रीमंत होण्याचे जे काही स्वप्न असते ते काही लोकं पूर्ण करू शकतात. विशेष म्हणजे आपण असे पाहतो की … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीवरून प्रलंबित योजनांचे पाच कोटी 96 लाख 65 हजार रुपये बँकेत वर्ग ! 18274 पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार

Sangamner News : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध गावांमधील वाडीवस्त्यावरील योग्य व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे .मात्र अनेक दिवसांपासून हे अनुदान रखडवले गेले होते. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी प्रशासनाकडे तातडीने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर आज शासनाने 18 हजार … Read more

कडाक्याच्या थंडीत अनुभवा उबदार वातावरण आणि मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या! भारतातील ‘ही’ ठिकाणी देतील तुम्हाला स्वर्गसुख

kovalam

Tourist Places In India:- सध्या जर आपण उत्तरेपासून बघितले तर संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे कडाक्याची थंडी जाणवत आहे व या थंडीच्या दिवसांमध्ये प्रवास करण्याची मजा काही औरच असते. बऱ्याच जणांना फिरायची मात्र खूप आवड असते. परंतु थंडीमुळे त्यांना शक्य होत नाही किंवा थंडी त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांना त्यांचे फिरण्याचे प्लान रद्द करावे लागतात. परंतु तुम्हाला … Read more

देशातील सर्वात स्वस्त विमा पॉलिसी देते ‘ही’ कंपनी! फक्त 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाख रुपयांचा जीवन विमा

insurance cover

Affordable Life Insurance:- सध्या मोठ्या प्रमाणावर विमा पॉलिसी खरेदी केले जातात व आर्थिक भविष्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचे देखील आहे. परंतु जर आपण अशा जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियम बघितले तर खूपच जास्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारच्या पॉलिसी घेणे परवडत नाही व त्यामुळे अनेकजण जीवन विमा पॉलिसी घेण्यापासून किंवा विमा संरक्षणापासून दूर राहतात. परंतु … Read more

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 149 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025 Details जाहिरात क्रमांक: 1914/96/AOCP/HRM/OFDR/PHASE-II पदाचे नाव आणि इतर … Read more

अहिल्यानगरमधील क्राईम रेट कमी झाला, शहरात ‘या’ ठिकाणी सीसीटीव्हीची करडी नजर !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील विविध शहरांमधील क्राईम रेट मोठ्या प्रमाणात वाढला असून हा क्राईम रेट कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर मध्ये चौका-चौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले असून याचा फायदा म्हणून अहिल्यानगर मधील क्राईम रेट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. … Read more

2025 मध्ये अहिल्यानगरात तयार होणार 3 नवीन उड्डाणपूल ! 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, महसूल भवनही होणार, जिल्ह्यातील कोणकोणते प्रकल्प मार्गी लागणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नवीन वर्ष अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की या नव्या वर्षात अहिल्या नगर मधील अनेक प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार आहेत. अनेक प्रकल्पांची कामे या नव्या वर्षात सुरु होणार आहेत. शहरात तीन नवीन उड्डाण पूल तयार होणार आहेत, महसूल भवन देखील तयार होणार आहे, स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेता … Read more

सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय दर्जाचे आयोजन

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा … Read more