उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उमेदवारी अर्ज नेला ! बारामतीत ताई विरुद्ध दादा संघर्ष होणार ? मोठ्या घडामोडी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण पूर्णतः बदलून गेले. मोठे दोन पक्ष फुटल्यानंतर प्रथमच निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत. त्यात काही जागा अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या जागेंकडे लागले आहे. यापैकी एक जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ.

येथे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याने व बारामती काकांची की पुतण्याची याचेही उत्तर मिळणार असल्याने या जागेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येथे सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दरम्यान आता याच घडामोडींदरम्यान आणखी एक महत्वाचे वृत्त आले आहे.

बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण ?

राजकीय घडामोडींदरम्यान आणखी एक महत्वाचे वृत्त आले आहे. बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण असाही संघर्ष पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्वतला जातोय. याचे कारण असे की, अजित पवारांच्या नावाने बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती एका मीडियाने दिली आहे.

१८ एप्रिलला सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांच्या नावे अर्ज नेला आहे. परंतु त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावेही अर्ज घेण्यात आल्याची खात्रीलायक बातमी समजली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांमुळे जर बाद झाला तर ऐनवेळेला उमेदवारीबद्दल प्रश्न उपस्थित राहू नये यासाठी अजित पवार यांच्याकडून अर्ज सादर केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. येथे शरद पवार यांना हरवण्यासाठी महायुतीकडून सर्व शर्थीचे प्रयत्न केले जात असून अजित पवारांच्या नावाने घेतलेला सर्ज हा त्याच खबरदारीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

डमी उमेदवारी अर्ज का? काय असते त्यामागील कारण

राजकीय पक्ष खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरुन ठेवत असतात. जर काही कारणास्तव मुख्य उमेदवाराचा अर्ज पडताळणीत बाद झाला तर ऐनवेळी उमेदवारच नाही अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी डमी उमेदवाराचा अर्ज भरून ठेवलेला असतो.

मुख्य उमेदवाराचा अर्ज जर काही कारणास्तव बाद झाला तर डमी उमेदवाराला निवडणूक लढवावी लागत असते.