Eknath Shinde : चिंचवडनंतर बारामती जिंकणार! मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शिलेदारावर सोपवली जबाबदारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तारासाठी पाऊल उचलले आहे. त्यांनी राज्यात यासाठी अनेकांच्या नेमणूका केल्या आहेत. लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नेमताना बारामत लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर सोपवली आहे.

या मतदारसंघात शिवतारेंना ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे लोकसभा तेच लढणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला पुरंदरचे आमदार आणि राज्यमंत्री असताना विजय शिवतारे यांनी कायम पवार कुटुंबीयांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विश्वास दाखवत शिवतारे यांना ताकद दिली. बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन मतदारसंघ आणखी मजबूत केला जाऊ शकतो.

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आवाहन देण्याचा प्रयत्न शिवतारे करणार, हे निश्चित मानले जाते. यामुळे ही निवडणूक पवारांची अवघड जाईल असे म्हटले जात आहे.

भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल आणि भीमराव तापकीर ही नावे देखील चर्चेत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने एक होऊन बदल घडवणं आवश्यक आहे. मी स्वतः त्यासाठी पर्याय म्हणून समोर येणार आहे, असेही ते म्हणाले.