Kasba by-election : मतदान एका दिवसावर आले असताना कसब्यातील काँग्रेस उमेदवाराचा मोठा निर्णय, थेट उपोषणच करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, कसब्यात पोलीस मतादारांना पैसे वाटत आहेत, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुळे आता कसब्यात वातावरण तापले आहे.

याठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होईल, असे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता ते उपोषणाला बसतील. यामुळे आता ऐन निवडणूकीच्या आदल्या दिवशी वातावरण फिरण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

ते म्हणाले, लाखो रुपये वाटले जात आहेत. पाण्यासारखे पैसे वाटत आहेत. है पैसे कुठून आले. पोलीस पैसे वाटत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. पोलिसांच्या उपस्थितीत पैसे वाटप केले जात आहेत.

आभाळ फाटून पैसे आले की काय? एवढा पैसा कुठून आला हेच कळत नाही. मतदारांना पैसे दाखवून दिशाभूल केलं जातंय. याचा निषेध म्हणून उद्या सकाळी उपोषणाला बसणार आहे, असेही ते म्हणाले.

तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस कमिश्नरला पत्र लिहिलं आहे. पण पोलिसांना पत्र लिहूनही काही उपयोग होत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस त्रास देत आहेत. ते कार्यकर्त्यांना घेऊन कमिश्नर ऑफिसला बसवत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.