Kasba : कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचा शरद पवार, राज ठाकरेंना फोन, बिनविरोध निवडणूकीची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kasba : सध्या राज्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच इतर पक्ष दोन दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करतील. असे असताना आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन
केल्याची माहिती आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. यामुळे आता निवडणूक होणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या पडला आहे.

दरम्यान, या विधानसभा क्षेत्रात दोन्ही मतदारसंघातील आमदारांचे निधन झाल्याने ही निवडणूक होत आहे. यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. असे असताना राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर पंढरपूर विधानसभा निवडणुकीची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

यामध्ये भाजपने त्याठिकाणी दिवंगत आमदार भारत भालके यांचे निधन झाले असताना निवडणूक लढवली. यामुळे आता आम्ही का माघार घेयची असे म्हटले आहे. तेव्हा देखील निवडणूक बिनविरोध करता आली असती, मात्र तसे केले गेले नाही.

दरम्यान, एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झालं तर त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केल्याची माहिती आहे.