Raju Shetty : आता संप करणारांचे डोळे उघडतील का? माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?, राजू शेट्टी यांची कविता होतेय व्हायरल..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raju Shetty : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी कोणीही जात नाही.

त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे सगळ पिकं वाया गेली आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण असा सवाल शेतकरी करत आहेत.

https://twitter.com/rajushetti/status/1637692528618090498?t=p960pMgL_-IzqJj_gubzTg&s=19

यासाठी आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एक कविता लिहिली आहे. सध्या ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, आज गारपीट झाली, अवकाळी झाला, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का? असेही ते म्हणाले.

राज्यात शेतकऱ्यांची आंदोलनं झाली मात्र त्यांनी कधीच कुणाची अडवणूक केली नाही. कांदा कवडीमोल भावाने विकला गेला, मात्र शेतकऱ्यांनी माणसांच्या भाज्या कधी बेचव होऊ दिल्या का असा सवाल केला आहे.

यामुळे आता तरी सरकारी कर्मचारी हे माघार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्चपासून शासकीय कर्मचारी बेमुंदत संपावर आहेत. त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे.