Shahjibapu Patil : काय तो डीजे, काय तो आवाज आणि काय तो शहाजीबापूंचा डान्स, सगळं काही ओकेच! धनुष्यबाण मिळताच जोरदार जल्लोष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shahjibapu Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केला. शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे. असे असताना सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी निकाल जाहीर होताच जल्लोष केला आहे.

पंढरपुरात शिंदे गटाच्या वतीने डीजे लावत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला. आमदार शहाजीबापूंनी आनंदाच्या भरात डान्स पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आणि जल्लोषाचे वातावरण पंढरपुरात पाहायला मिळाले.

शिंदे गटाला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर शहाजीबापूंच्या महुद या मूळगावी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही.

त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणले होते. तेव्हापासून कोर्टात हे प्रकरण गेले होते.

या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता.