Real Estate Investment: पुण्यामध्ये घर खरेदी करायचे असेल तर ‘हे’ आहे सर्वात प्रीमियम ठिकाण! वाचा घरांच्या किमती आणि महत्त्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Real Estate Investment:- सध्या भारतामध्ये रियल इस्टेट क्षेत्रामधील गुंतवणूक फार झपाट्याने वाढत असून येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीनच यामध्ये वाढ होईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्राने खूप मोठ्या प्रमाणावर भरारी घेतलेली दिसून येते. कारण देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत असल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला देखील बूस्ट मिळणे आता सुरू झाले आहे.

या दृष्टिकोनातून जर आपण एनएचबी अर्थात नॅशनल हाऊसिंग बँकेचा वार्षिक अहवाल पाहिला तर गेल्या दोन वर्षांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त किमतीची होम लोन 120 टक्क्यांनी वाढले आहेत. तसाच बँकांचा विचार केला तर बँकांच्या ब्रॅकेटमध्ये गृह कर्जाचा पोर्टफोलिओमध्ये दुपटीने वाढ होऊन तो 3.33 लाख कोटी रुपये झाला आहे.

एवढेच नाही तर एका वर्षामध्ये बँकांनी जे काही एकूण कर्ज दिले त्यामध्ये 50 लाखांवरील गृहकर्जाचा वाटा तब्बल 65 टक्के राहिला आहे. या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की रियल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढताना दिसून येत आहे. याच आकडेवारीला धरून महाराष्ट्रातील पुणे सारख्या शहरांमध्ये देखील आता निवासी आणि व्यावसायिक असे दोन्ही विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढताना दिसून येत आहे.

याच अनुषंगाने जर आपण पुणे शहरामध्ये जर कोणाला घर घ्यायचे असेल तर सर्वात प्रीमियम असलेले ठिकाणांचा विचार केला तर यामध्ये औंध हा परिसर खूप महत्त्वाचा आहे. या परिसरामध्ये अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या असून  निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी औंध परिसरात मोठा वाव आहे.

 प्रॉपर्टी मधील गुंतवणुकीसाठी औंध का आहे फायद्याचे?

पुण्यामध्ये हिंजवडी आयटी पार्क असून या ठिकाणी आयटीशी संबंधित अनेक कंपन्या व कार्यालय असून या कॉरिडॉर मधील निवासी जागांची मागणी वाढत असताना हिंजवडीच्या अगदी जवळ असलेल्या औंध या ठिकाणाला देखील त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आलेले आहे. या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध असल्यामुळे पश्चिम कॉरिडॉर मधील हे एक महत्त्वाचे आणि फायदेशीर असे ठिकाण आहे.

तसेच या ठिकाणाहून पुणे मुंबई महामार्ग देखील जात आहे व लोकलला औंधच्या रहिवाशांनी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने व सुरक्षिततेसाठी पाच पैकी तब्बल 4.3 असे रेटिंग दिले असल्यामुळे बहुसंख्य पुणेकरांचा औंध हा एक आवडता परिसर झाला आहे. यामुळेच अनेक बांधकाम क्षेत्रातील दिग्गज व्यवसायिकांनी या ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत या ठिकाणी अनेक कामे झाले असल्यामुळे औंधचा परिसर आता चकाचक आणि सुंदर दिसायला लागला आहे.

प्रशस्त असलेले फूटपाथ तसेच रस्त्यांचे सुशोभीकरण या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने लक्ष वेधून घेतात. तसेच बाणेर पाषाण लिंक रोड, बाणेर, पिंपळे निलख, पाषाण यासारख्या जवळपासच्या उपनगरांना देखील औंधची रस्त्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. तसेच शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर औंध पासून जवळच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असून अनेक नामांकित शाळा व महाविद्यालये या ठिकाणी आहेत.

शॉपिंगच्या दृष्टिकोनातून रिलायन्स तसेच सेंट्रीओल मॉल या ठिकाणी आहेत.तसेच सोने, कपडे, अनेक वाहनांची शोरूम्स, हार्डवेअर व किरणांची दुकाने तसेच मेडिकल देखील मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये आहेत. महत्वाचे म्हणजे औंध पासून जवळच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग देखील जात आहे. परिसराच्या जवळच खडकी रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड देखील आहे. औंध वरून तुम्हाला कुठेही जायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या ठिकाणी प्रगत आहे.

 सध्या औंध या ठिकाणी घरांच्या किमती कशा आहेत?

1- वन बीएचके फ्लॅट सध्या वन बीएचकेची किंमत या ठिकाणी 45 ते 65 लाख रुपये आहे.

2- टू बीएचके फ्लॅट सध्या या ठिकाणी टू बीएचकेची किंमत 70 लाख ते दीड कोटी पर्यंत आहे.

3- थ्री बीएचके फ्लॅट सध्या थ्री बीएचकेची या ठिकाणी किंमत 1.30 ते दोन कोटी पर्यंत आहे.

4- फोर बीएचके फ्लॅट औंध मध्ये फोर बीएचकेची सध्याची किंमत दीड कोटी ते साडेतीन कोटीच्या दरम्यान आहे.

5- बंगलो औंध परिसरामध्ये बंगलोची किंमत तीन कोटी ते दहा कोटींच्या दरम्यान आहे.

 या ठिकाणी गुंतवणूक का आहे फायद्याची?

जर तुम्ही औंध या ठिकाणी फ्लॅट किंवा कार्यालयाच्या जागांमध्ये गुंतवणूक केली तर किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर या ठिकाणी या क्षेत्रात गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट वाढले आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांमध्ये दीड ते 12 टक्क्यांनी प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे व प्रॉपर्टींना या ठिकाणी भाडे देखील जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रॉपर्टीतील गुंतवणूक भविष्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे.