मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 29 कोटी 15 लाख; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शिंदे फडणवीस सरकारने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत चर्चा रंगत होत्या. या योजनेसाठी विमा कंपनी नियुक्त केली नसल्याने अनेक अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीपासून वंचित रहावे लागत होते.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून अपघात ग्रस्त आणि मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जावी अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान पहिल्या टप्प्यातील 1508 पात्र विमा दावे निकाली काढण्यासाठी या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबांना 29 कोटी 15 लाख रुपये वितरित करण्यास शुक्रवारी मान्यता देण्यात आली आहे. आता लवकरच ही रक्कम अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबांना देऊ केली जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना दोन लाख रुपयाची मदत दिली जाते. शेतकरी कुटुंबात शेतकरी त्याची/त्याचा पत्नी/पती, मुलगा, मुलगी, आई, वडील यांचा समावेश होत असतो. आतापर्यंत ही योजना विमा कंपनीकडून राबवली जात होती. मात्र आता शासनाकडून नियुक्त झालेल्या एका समितीच्या माध्यमातून अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 पर्यंतचा खंडित कालावधी गृहीत धरून शासन नियुक्त समितीच्या माध्यमातून सदर कालावधी मधील अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रस्ताव तपासून रक्कम वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. याच खंडित कालावधीतील 1508 शेतकरी अपघाताचे दावे निकाली काढण्यात आले असून संबंधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 15 लाख रुपय वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे.

या 1508 शेतकरी अपघातामध्ये 1482 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 26 शेतकऱ्यांना अपंगत्व आल आहे. निश्चितच शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे या संबंधित शेतकऱ्यांना अन शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी कुटुंबातून कर्ता पुरुष किंवा स्त्री अपघातामुळे बाधित होत असल्याने संबंधित शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. यामुळेच शासनाच्या माध्यमातून अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आता या योजनेच स्वरूप शासनाने बदलल आहे.

पूर्वी ही योजना कंपनीच्या माध्यमातून राबवली जात होती मात्र आता ही योजना शासनाकडून राबवली जाणार असून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे विमा दावे निकाली काढण्यासाठी शासनाकडून समिती नियुक्त केली जाणार आहे. शिवाय पूर्वी अपघातात अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत मिळत होती आता मात्र दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.